MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • मराठवाड्यासाठी गुड न्यूज! उन्हाळी सुट्टीत 'दिल्लीवारी' झाली सोपी; नांदेड-संभाजीनगरमार्गे धावणार स्पेशल ट्रेन, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मराठवाड्यासाठी गुड न्यूज! उन्हाळी सुट्टीत 'दिल्लीवारी' झाली सोपी; नांदेड-संभाजीनगरमार्गे धावणार स्पेशल ट्रेन, पाहा संपूर्ण वेळापत्रक

nanded sambhajinagar delhi summer special train: दक्षिण मध्य रेल्वेने मराठवाड्यातील प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नांदेड ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) दरम्यान एक विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू केली आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 05 2026, 05:49 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मराठवाड्यासाठी गुड न्यूज! उन्हाळी सुट्टीत 'दिल्लीवारी' झाली सोपी
Image Credit : Asianet News

मराठवाड्यासाठी गुड न्यूज! उन्हाळी सुट्टीत 'दिल्लीवारी' झाली सोपी

छत्रपती संभाजीनगर: उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या की वेध लागतात ते सहलीचे! पण ऐनवेळी रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवणे म्हणजे एक दिव्यच असते. प्रवाशांची हीच अडचण ओळखून दक्षिण मध्य रेल्वेने मराठवाड्यातील प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलं आहे. हुजूर साहिब नांदेड ते हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली) दरम्यान विशेष उन्हाळी एक्स्प्रेस धावणार आहे. विशेष म्हणजे, सचखंड आणि संपर्क क्रांतीनंतर दिल्लीला जाणारी ही चौथी थेट रेल्वे ठरणार असल्याने प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
रेल्वेचे वेळापत्रक आणि फेऱ्या (ट्रेन नं. ०७६२१ / ०७६२२)
Image Credit : ANI

रेल्वेचे वेळापत्रक आणि फेऱ्या (ट्रेन नं. ०७६२१ / ०७६२२)

ही विशेष रेल्वे साप्ताहिक असून एप्रिल आणि मे महिन्यात एकूण ८ फेऱ्या पूर्ण करेल.

१. नांदेड ते दिल्ली (०७६२१)

कालावधी: ११ एप्रिल ते ३० मे (प्रत्येक शनिवारी).

वेळ: नांदेडहून सकाळी ८:४५ वाजता सुटेल.

संभाजीनगर आगमन: सकाळी ११:४० वाजता पोहोचेल आणि ११:५० ला दिल्लीकडे रवाना होईल.

दिल्लीत आगमन: दुसऱ्या दिवशी दुपारी २:०० वाजता (हजरत निजामुद्दीन).

२. दिल्ली ते नांदेड (०७६२२)

कालावधी: १२ एप्रिल ते ३१ मे (प्रत्येक रविवारी).

वेळ: दिल्लीहून (निजामुद्दीन) रात्री ९:४० वाजता सुटेल.

संभाजीनगर आगमन: दुसऱ्या दिवशी रात्री ८:३० वाजता.

नांदेडमध्ये पोहोचण्याची वेळ: मध्यरात्री १२:३५ वाजता. 

Related Articles

Related image1
PM Kisan: २३ वा हप्ता हवाय? मग शेतकऱ्यांनो 'या' ३ गोष्टी तातडीने करा; अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत!
Related image2
Pune Railway Station: पुणेकरांचा रेल्वे प्रवास होणार हायटेक! वर्षभरात ६ नवे फलाट; १७०० कोटींच्या विकासकामांनी स्टेशनचा कायापालट
35
प्रवासाचे मुख्य थांबे
Image Credit : Social Media

प्रवासाचे मुख्य थांबे

ही रेल्वे मराठवाडा आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल.

नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कँट आणि मथुरा. 

45
आरक्षणाची तारीख विसरू नका!
Image Credit : South Western Railways - SWR

आरक्षणाची तारीख विसरू नका!

या विशेष रेल्वेसाठीचे आरक्षण ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे या गाडीला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवाशांनी आपले तिकीट त्वरित बुक करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. 

55
मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा
Image Credit : South Western Railways - SWR

मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा

याआधी जाहीर झालेल्या २९ विशेष गाड्यांमध्ये संभाजीनगरचा समावेश नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. मात्र, नव्या निर्णयामुळे आता जालना, परभणी आणि संभाजीनगरच्या प्रवाशांना दिल्ली, आग्रा आणि मथुरा येथे जाण्यासाठी एक हक्काचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Board Supplementary Exam 2026 : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 16 जूनपासून परीक्षांना होणार सुरुवात
Recommended image2
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; RCC संस्थापकाला CBI कडून अटक, लातूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन
Recommended image3
उद्धव ठाकरेंचा हा खासदार शिंदे गटाला मिळणार, नाव ऐकून म्हणाल हे कस झालं?
Recommended image4
बैल कापला तर आम्ही, संग्राम जगताप यांनी दिला मोठा इशारा
Recommended image5
ST Bus Fare Hike : डिझेल दरवाढीचा ST महामंडळाला फटका; बसभाडे वाढीचे संकेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य
Related Stories
Recommended image1
PM Kisan: २३ वा हप्ता हवाय? मग शेतकऱ्यांनो 'या' ३ गोष्टी तातडीने करा; अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत!
Recommended image2
Pune Railway Station: पुणेकरांचा रेल्वे प्रवास होणार हायटेक! वर्षभरात ६ नवे फलाट; १७०० कोटींच्या विकासकामांनी स्टेशनचा कायापालट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved