सार

शरद पवार यांनी अजित पवार यांना बारामतीत निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आहे. युगेंद्र पवारांना पुढे करत शरद पवारांनी नेतृत्व बदलाचा नारा दिला आहे. बारामतीतून प्रचाराची सुरुवात करत शरद पवारांनी अजितदादांची मस्करी केली.

शरद पवार यांनी अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत त्यांच्या होम ग्राउंडवर म्हणजेच बारामती येथे आव्हान उभं केलं आहे. येथे अजित पवार आणि युगेंद्र पवार या दोघांमध्ये सरळ लढत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी येथून निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं होत पण त्यांच्या पक्षाने बारामती येथून तिकीट जाहीर करून परत एकदा अजित पवारच बारामती येथून पक्षाचे उमेदवार असतील हे दाखवून दिल आहे. 

शरद पवार यांनी नेतृत्व बदल करण्याचे दिले आव्हान - 
अजित दादांनी 25-30 वर्षे नेतृत्वं केलं. आता नवं नेतृत्वं म्हणून युगेंद्र पवारांना संधी द्या, असं आवाहन शरद पवारांनी बारामतीकरांना दिलं. तसंच स्वत:च्या संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिलेत. बारामतीत अजित पवारांचं नेतृत्वंच बदलण्याचं आवाहन पवारांनी केलं. बारामतीत अजित दादांनी 25 ते 30 वर्षे कामं केली. पण आता पुढच्या 30 वर्षांची काम करणारं नेतृत्वं तयार करायचं आहे. त्यासाठीच युगेंद्र पवारांना उमेदवारी दिलीय, असे आव्हान शरद पवार यांनी केल्यामुळे बारामती येथील राजकारण बदलाचे संकेत मिळाले आहेत. 

कन्हेरी गावातून प्रचाराची केली सुरुवात - 
युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सुरुवात कन्हेरी गावातून करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेत शरद पवार यांनी अजित पवारांची मस्करी केली होती, त्यामुळे उपस्थित सर्व जनता हास्यकल्लोळात बुडालेली दिसून आली. आता येथील लढत कोण जिंकत याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे.