- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather LATEST update : महाराष्ट्रात बुधवारी गारठ्याची लाट! दोन जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट
Maharashtra Weather LATEST update : महाराष्ट्रात बुधवारी गारठ्याची लाट! दोन जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट
Maharashtra Weather LATEST update : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीची तीव्र लाट आली आहे. तापमानात मोठी घट झाली असून, हवामान खात्याने नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी १९ नोव्हेंबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रात गारठला
मुंबई: राज्यात हिवाळ्याची लाट पुन्हा एकदा तीव्र झाली असून, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात कडक गारठा जाणवू लागला आहे. दिवसेंदिवस तापमानात घट होत असून, 19 नोव्हेंबर रोजी दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईतही थंडीची चाहूल स्पष्टपणे जाणवत आहे. 19 नोव्हेंबर रोजी मुंबईत किमान तापमान 18°C, तर कमाल तापमान 33°C इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
Cold wave to severe cold wave very likely to prevail at a few places over Madhya Maharashtra and cold wave very likely to occur in isolated places over Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 18, 2025
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला
पुण्यातील थंडीने नागरिकांना गारठून टाकले आहे. सोमवारी पुण्यात तापमान 9°C पर्यंत खाली आले होते. 19 नोव्हेंबरला तापमान 10°C च्या आसपास राहील अशी शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये देखील रात्रीचा पारा घसरत असून तापमान 18°C च्या आसपास स्थिर राहण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात हाडे गोठवणारा गारठा, नाशिक व जळगावला यलो अलर्ट
राज्यात सर्वाधिक थंडीचा सामना उत्तर महाराष्ट्र करत आहे. नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यांना हवामान खात्याने 19 नोव्हेंबरसाठी यलो अलर्ट दिला आहे.
नाशिकमध्ये सोमवारी तापमान 8°C पर्यंत घसरले, तर मंगळवारी ते 10°C राहण्याचा अंदाज.
जळगावमध्येही तापमानात लक्षणीय घट कायम राहील.
विदर्भात गारठा कमी, पण तापमानात सौम्य बदल
छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान आणि कमाल तापमानात 2°C वाढ होण्याची शक्यता आहे. येथे किमान तापमान 12°C, तर कमाल तापमान 31°C इतके राहील.
विदर्भातील थंडी तुलनेने कमी आहे.
नागपूरमध्ये किमान तापमानात 2°C वाढ होऊन ते 13°C होईल.
अमरावतीत कमाल तापमान 28°C, तर किमान तापमान 13°C च्या आसपास राहील.
राज्यात पुन्हा शिरला कडाका, नागरिकांनी घ्यावी काळजी
राज्यातील अनेक भागात तापमान एक अंकी संख्या दाखवत असून, गारठा पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

