Maharashtra IAS Officer Transfers: देवेंद्र फडणवीस सरकारने प्रशासकीय पातळीवर पुन्हा एकदा मोठे फेरबदल केले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान राज्यातील पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

मुंबई: राज्याच्या कारभाराची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आल्यानंतर प्रशासकीय पातळीवर जलद हालचाली सुरूच आहेत. विशेष म्हणजे, मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच महत्त्वाच्या बदल्या करण्याची परंपरा या आठवड्यातही कायम राहिली आहे. याच बैठकीदरम्यान राज्यातील पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा करण्यात आली. फडणवीस सरकारकडून गेल्या काही आठवड्यांपासून नियमितपणे आठ-दहा अधिकाऱ्यांची फेरबदल केले जात असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर या आठवड्यातही राज्यातील प्रशासकीय रचनेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांना कुठे नवी जबाबदारी?

१. राहुल रंजन महिवाल (IAS:RR:2005)

महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती.

२. प्रकाश खपले (IAS:SCS:2013)

आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर

यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली.

३. डॉ. मंजिरी मानोलकर (IAS:SCS:2016)

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे

यांची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे आयुक्त म्हणून नियुक्ती.

४. त्रिगुण कुलकर्णी (IAS:SCS:2016)

उपमहासंचालक, यशदा, पुणे

यांची एससी आणि एचएससी बोर्ड, पुणे येथे अध्यक्ष पदावर नियुक्ती.

५. अंजली रमेश (IAS:RR:2020)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली

यांची मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त पदावर बदली.

ही फेरबदल प्रक्रिया पाहता, फडणवीस सरकार राज्य प्रशासन अधिक गतिमान आणि कार्यक्षम बनवण्यासाठी जलदगतीने निर्णय घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.