MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • MahaDBT Alert : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना! 9 जानेवारीपर्यंत ‘हे’ न केल्यास मंजूर अर्ज थेट रद्द होणार

MahaDBT Alert : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना! 9 जानेवारीपर्यंत ‘हे’ न केल्यास मंजूर अर्ज थेट रद्द होणार

MahaDBT Farmer Scheme Application Status : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर प्रलंबित अर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून पूर्व संमती मिळवण्यासाठी ९ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Jan 05 2026, 07:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना!
Image Credit : iSTOCK

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना!

मुंबई : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलसंदर्भात राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी महाडीबीटी पोर्टलवर पूर्व संमती (Pre-Approval) पर्याय बंद करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, आता शासनाने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे, त्यांचे अर्ज पूर्व संमतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना शुक्रवार, 9 जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. 

26
प्रलंबित अर्जांसाठी शासनाची शेवटची संधी
Image Credit : Getty

प्रलंबित अर्जांसाठी शासनाची शेवटची संधी

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर गेल्या सहा महिन्यांत सोडतीत निवड झालेल्या अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अर्ज अद्यापही शेतकरी स्तरावर प्रलंबित असून, आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड झालेली नाहीत. ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने शेवटची आणि अंतिम संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Related Articles

Related image1
MBA Fees in Canada : लाइफ सेट करायची आहे? 2026 मध्ये कॅनडाला जायला व्हा तयार, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती
Related image2
Pune Train Update : रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! पुढील 10 दिवस पुण्यातून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द
36
9 जानेवारीनंतर कोणतीही मुदतवाढ नाही
Image Credit : Asianet News

9 जानेवारीनंतर कोणतीही मुदतवाढ नाही

प्रशासनाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, 9 जानेवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड न केल्यास संबंधित अर्ज आपोआप (Auto Delete) रद्द केले जाणार आहेत. त्यामुळे अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल, तर शेतकऱ्यांनी दिलेल्या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अर्ज कायमस्वरूपी रद्द होतील आणि त्यांचा पुढील विचार केला जाणार नाही. 

46
वेळेत पूर्व संमती मिळालेल्या अर्जांना दिलासा
Image Credit : Asianet News

वेळेत पूर्व संमती मिळालेल्या अर्जांना दिलासा

महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्रे अपलोड करून पूर्व संमती प्राप्त केली आहे, त्यांचे अर्ज नंतर कोणत्याही कारणास्तव रद्द केले जाणार नाहीत, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

56
कागदपत्रांच्या नियमांमध्ये सुलभता
Image Credit : ChatGPT

कागदपत्रांच्या नियमांमध्ये सुलभता

अनुदान योजनांसाठी कागदपत्रांच्या बाबतीत काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आता

सातबारा उतारा

आठ-अ उतारा

गाव-शिवाराचा पत्ता

आधार क्रमांक

बँक खाते क्रमांक

ही कागदपत्रे स्वतंत्रपणे सादर करण्याची आवश्यकता नाही.

मात्र, यांत्रिकीकरणाशी संबंधित योजनांसाठी दरपत्रक (कोटेशन) देणे बंधनकारक असून, फलोत्पादन योजनांसाठी प्राकलन (इस्टिमेट) सादर करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱ्यांना पूर्वसंमतिपत्र देण्यात येणार आहे. 

66
निष्काळजीपणा ठरू शकतो महागात
Image Credit : Getty

निष्काळजीपणा ठरू शकतो महागात

जर एखाद्या शेतकऱ्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नाही, तर अशा अर्जांवर संगणकीय प्रणालीद्वारे सात दिवसांनंतर स्वयंचलित कारवाई केली जाईल आणि अर्ज रद्द केले जातील. तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव किंवा दुर्लक्ष यामुळे अनुदानाचा लाभ गमावण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Pune Train Update : रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! पुढील 10 दिवस पुण्यातून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द
Recommended image2
चला, चला वाघ बघायला, पुण्यात 10 जानेवारीला ताडोबातील पट्टेदार वाघ बघायला मिळणार!
Recommended image3
पुण्याजवळ वन्यजीव सर्वेक्षणात हा कोणता जीव आढळला? महाराष्ट्राशी आहे खास नाते!
Recommended image4
पुणेकरांची प्रतीक्षा संपणार! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 'या' तारखेपासून धावणार; तांत्रिक चाचणीचा मोठा टप्पा पार
Recommended image5
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! पुण्याला मिळणार 60 अतिरिक्त नवीन रेल्वे, 6 नवीन प्लॅटफॉर्म आणि 'सॅटेलाइट टर्मिनल'ही!
Related Stories
Recommended image1
MBA Fees in Canada : लाइफ सेट करायची आहे? 2026 मध्ये कॅनडाला जायला व्हा तयार, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती
Recommended image2
Pune Train Update : रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! पुढील 10 दिवस पुण्यातून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved