सार

बीडमध्ये मतदानावेळी अनुचित प्रकार घडले असून संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही लावलेच नाही, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले तर काही ठिकाणी सीसीटीव्ही लाऊन ते बंद केल्याचा आरोपही बजरंग सोनवणे यांनी केला आहे.

बीडमध्ये मतदानावेळी अनुचित प्रकार घडले असून संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही लावलेच नाही, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले तर काही ठिकाणी सीसीटीव्ही लाऊन ते बंद केल्याचा आरोपही बजरंग सोनवणे यांनी केला आहे. बीडमधील काही गावांमध्ये पोलिंग बूथ कॅप्चरिंग करून मतदान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासर्व प्रकारावरून बजरंग सोनवणे यांनी बीड मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान काल १३ मे रोजी पार पडले. या तिसऱ्या टप्प्यात एकूण ११ जागांवर मतदान पार पडले. यामध्ये बीडचा देखील समावेश होता. बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात लोकसभेचा सामना रंगला.