MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • 'पवार कुटुंब म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, अजित पवार...', ओबीसी नेत्याची पवारांवर जहरी टीका

'पवार कुटुंब म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, अजित पवार...', ओबीसी नेत्याची पवारांवर जहरी टीका

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबाची तुलना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी केली आहे आणि अजित पवारांना 'ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर आणि भांडवलदार' यांचे नेते म्हटले आहे. सुप्रिया सुळेंना मिळालेल्या संसदरत्न पुरस्कारावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Aug 17 2025, 04:43 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
Image Credit : Asianet News

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असलेल्या पवार कुटुंबावर एका ओबीसी नेत्याने थेट आणि गंभीर टीका केली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबाची तुलना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी केली आहे, तर अजित पवार यांना 'ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर आणि भांडवलदार' यांचे नेते म्हटले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या संसदरत्न पुरस्कारावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

24
Image Credit : Google

शनिवारी पुरंदर तालुक्यातील निरा येथे माध्यमांशी संवाद साधताना हाके यांनी ही टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही असो, पवार कुटुंबीय नेहमीच सत्तेच्या जवळ राहतात आणि तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात असतात. म्हणूनच मला सत्ताधाऱ्यांवर प्रश्न विचारण्याऐवजी पवारांवर टीका करावी लागत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Related image1
Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी, कोकण किनारपट्टीवर होणार चांगला पाऊस
Related image2
Ladki Bahin Yojana : पात्र महिलांवर अन्याय होणार नाही, आदिती तटकरे यांची ग्वाही
34
Image Credit : social media

'मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष अटळ'

यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, जरांगे यांना संविधानाचे ज्ञान नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही, तर ते संविधानानुसारच मिळते. जरांगे यांच्या कृतीमुळे मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये संघर्ष निर्माण होत आहे, असा आरोप त्यांनी केला. हा संघर्ष भविष्यात तीव्र होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आणि त्यांनी सावध राहावे, असे आवाहन केले.

44
Image Credit : social media

सुप्रिया सुळेंच्या कार्यावर प्रश्नचिन्ह

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधताना हाके म्हणाले की, सुप्रिया सुळे फक्त त्यांच्या वडिलांच्या (शरद पवार) नावावर निवडून येतात. संसदेमध्ये त्यांचे काम काय आहे? त्यांना 'संसदरत्न' पुरस्कार कशासाठी मिळाला? असा सवाल त्यांनी विचारला. त्यांनी समाजातील गरीब आणि तळातल्या लोकांचे प्रश्न कधी संसदेत मांडले आहेत का, असा प्रश्नही हाके यांनी उपस्थित केला.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Viral video : माणुसकीचे दर्शन; काठी टेकवत आलेल्या आजीबाईंसाठी थांबली लोकल ट्रेन!
Recommended image2
पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडताना काळजी घ्या! JM आणि FC रोडसह प्रमुख रस्ते ९ तास राहणार 'सील'; जाणून घ्या पर्यायी मार्ग
Recommended image3
पॅरिसच्या रस्त्यावर ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा; भारतीय पर्यटकांच्या त्या वागण्यावर नेटकरी संतापले, म्हणाले; 'यांना परत पाठवा!'
Recommended image4
Ration Card Update : रेशन कार्डधारकांसाठी मोठा इशारा! सरकारचा कठोर निर्णय; या १० निकषांवरच मिळणार स्वस्त धान्य
Recommended image5
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! लक्ष्मी रोडसह शहरातील 6 गजबजलेल्या रस्त्यांवर फक्त 4 रुपयांत पार्किंग
Related Stories
Recommended image1
Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी, कोकण किनारपट्टीवर होणार चांगला पाऊस
Recommended image2
Ladki Bahin Yojana : पात्र महिलांवर अन्याय होणार नाही, आदिती तटकरे यांची ग्वाही
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved