- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता खात्यात जमा! तुमचे पैसे आले का?, 'या' सोप्या पद्धतीने जाणून घ्या
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता खात्यात जमा! तुमचे पैसे आले का?, 'या' सोप्या पद्धतीने जाणून घ्या
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा ₹१,५०० चा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा झाला आहे. पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्याचे विविध मार्ग उपलब्ध असून, पुढील हप्ता मिळवण्यासाठी १८ नोव्हेंबरपूर्वी E-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे.

लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता खात्यात जमा!
मुंबई: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा ₹१,५०० सन्मान निधी आजपासून लाभार्थींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याची माहिती दिली असून सर्व पात्र महिलांना टप्प्याटप्प्याने रक्कम वितरित केली जात आहे.
काय आहे लाडकी बहीण योजना?
राज्य सरकारने जुलै २०२४ मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ₹१,५०० इतकी आर्थिक मदत थेट जमा केली जाते. या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भरतेचा नवा आधार मिळाला आहे.
तुमच्या खात्यात हप्ता आला आहे का? अशा पद्धतीने तपासा
तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी खालील सोपे उपाय वापरा
बँकेच्या ग्राहकसेवेशी संपर्क करा:
आपल्या बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून खात्यात आलेल्या रकमेची चौकशी करा.
ऑनलाईन बँकिंग / ॲप वापरा:
इंटरनेट बँकिंग किंवा बँकेचे अधिकृत ॲप वापरून खाते तपासा. स्टेटमेंट डाऊनलोड करूनही तपासता येईल.
एसएमएस तपासा:
पैसे जमा झाल्यावर बँक नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवते. तो मेसेज आला आहे का ते पाहा.
बँक शाखेला भेट द्या:
ऑनलाईन सुविधा न वापरणाऱ्या महिलांनी थेट बँकेच्या शाखेत जाऊन कर्मचाऱ्यांकडून खात्री करून घ्यावी.
18 नोव्हेंबरपूर्वी E-KYC पूर्ण करणे आवश्यक
मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थ्यांना E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://ladakibahin.maharashtra.gov.in ही सुविधा उपलब्ध आहे. E-KYC 18 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण न केल्यास पुढील महिन्याचा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते.
महिलांच्या सक्षमीकरणाची अखंड वाटचाल
“महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या विश्वासाने सुरू झालेली सक्षमीकरणाची ही चळवळ पुढे नेण्यासाठी प्रत्येक लाभार्थिनीने आपली KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी,” असे आवाहन तटकरे यांनी केले आहे. लाडकी बहीण योजना आज लाखो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी ठरली आहे.

