- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता ₹1500! तुमच्या खात्यात कधी जमा होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता ₹1500! तुमच्या खात्यात कधी जमा होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणारय, यासाठी ₹410.30 कोटींचा निधी मंजूर झाला. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थींनी 18 नोव्हेंबरपर्यंत आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर
Ladki Bahin Yojana October Installment Update: महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच प्रत्येक पात्र लाभार्थीच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी ₹410.30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत येत्या २-३ दिवसांत ऑक्टोबरचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तरीही, शासनाकडून हप्त्याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख
अदिती तटकरे यांनी आवाहन केले आहे की, 18 नोव्हेंबर पर्यंत लाभार्थींनी आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर e-KYC पूर्ण नसेल, तर पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नाही.
e-KYC कशी करावी?
अधिकृत संकेतस्थळ: https://ladakibahin.maharashtra.gov.in
मुखपृष्ठावर e-KYC बॅनरवर क्लिक करा.
आधार क्रमांक आणि पडताळणी कोड (Captcha) भरून Send OTP क्लिक करा.
मोबाईलवर आलेला OTP टाका आणि Submit क्लिक करा.
जर आधार आधीपासून नोंदणीकृत असेल, “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
नवे टप्पे: पती/वडिलांचा आधार, जात/प्रवर्ग निवडणे आणि प्रमाणित बाबी स्वीकारणे.
शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
लाडकी बहीण योजनेचे निकष
लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.
आधार कार्ड लिंक नसलेल्यांना योजनेतून वगळले जाईल.
अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
अर्जातील नावे आणि बँक खात्यावरील नावे जुळली पाहिजेत, अन्यथा लाभ रद्द होईल.
नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना हे हप्ता लागू होणार नाही.

