- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं स्पष्टीकरण
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं स्पष्टीकरण
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाडकी बहीण योजना' बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले असून, महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत राहतील. यासोबतच, 'लखपती दीदी' योजनेतून महिलांना स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा संकल्प आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलं दिलासादायक स्पष्टीकरण!
Ladki Bahin Yojana: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’चा राज्यव्यापी शुभारंभ करण्यात आला. या वेळी एक महत्त्वाचं स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, ‘लाडकी बहीण योजना’ कुठेही बंद केली जाणार नाही.
महिलांना दरमहा १५०० रुपये मदत सुरूच राहणार
‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. काही अपप्रचारांमुळे योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत महिलांना धीर दिला आणि विश्वास दिला. “फक्त १५०० रुपयांवर थांबणार नाही, आम्ही महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी नव्या संधी उपलब्ध करून देत आहोत,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘लखपती दीदी’ बनवण्याचा संकल्प!
सरकारचा पुढचा टप्पा अजून मोठा आहे. राज्यातील एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. म्हणजेच अशा महिला ज्या दरवर्षी १ लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न कमवतील. यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील पतसंस्था सुरू करण्यात येणार आहेत. महिलांना १ लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज दिलं जाणार आहे. त्या स्वतः व्यवसाय सुरू करतील आणि इतर महिलांनाही रोजगार देतील.
गावांचा सर्वांगीण विकास केंद्रबिंदूवर
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, राज्याचा खरा विकास गावांच्या प्रगतीवर अवलंबून आहे.
“गरीब, कामगार आणि ग्रामीण भाग समृद्ध झाल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती शक्य नाही,” असं ते म्हणाले.
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत 28,000 ग्रामपंचायती आणि 40,000 गावांना आदर्श गावं बनवण्याचा संकल्प आहे.
या मोहिमेतून स्वच्छता, पाणी, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या सर्व बाबींवर काम होणार आहे.
CSR निधी, सरकारी योजना आणि लोकसहभाग याच्या जोरावर गावांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा मानस आहे.
मनरेगा आणि सरकारी योजनांमधून गावपातळीवर मोठं काम
अंगणवाड्या, पाण्याच्या टाक्या, रस्ते, नाले खोलीकरण यांसारखी कामं हाती घेण्यात येणार आहेत.
17 प्रकारच्या व्यवसायांवर आधारित गट गावांमध्ये तयार केले जातील.
दलित, आदिवासी आणि मागास वर्गातील महिलांनाही विशेष संधी दिल्या जातील.
मुख्यमंत्र्यांचा संदेश, "आपल्या बहिणींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये"
“लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट आम्ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून संपूर्ण राज्याच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहोत,” असा ठाम संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

