- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींसाठी महत्वाची बातमी! 18 नोव्हेंबरपूर्वी ‘हे’ काम नक्की करा, नाहीतर थांबेल 1500 रुपयांचा लाभ!
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींसाठी महत्वाची बातमी! 18 नोव्हेंबरपूर्वी ‘हे’ काम नक्की करा, नाहीतर थांबेल 1500 रुपयांचा लाभ!
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹1500 चा लाभ सुरू ठेवण्यासाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलीय. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषित केल्यानुसार18 नोव्हेंबर 2025 ही e-KYC करण्याची अंतिम तारीख आहे.

लाडक्या बहीणींसाठी महत्वाची बातमी!
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला ₹1500 चा थेट आर्थिक लाभ दिला जातो. मात्र, या लाभासाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून तिची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत सर्व लाभार्थी महिलांना तारीख चुकवू नका, असं आवाहन केलं आहे.
18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख!
आदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणि सातत्य ठेवण्यासाठी e-KYC सुविधा सुरू करण्यात आली आहे. 18 सप्टेंबरपासून https://ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही प्रक्रिया सुरू आहे. बहुतेक लाभार्थिनींनी प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र उर्वरित महिलांनी 18 नोव्हेंबरपूर्वी नक्की पूर्ण करावी.” या तारखेआधी e-KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यास महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ थांबू शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
e-KYC प्रक्रिया कशी कराल? (Step-by-Step Guide)
सर्वप्रथम ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा.
“e-KYC प्रक्रिया पूर्ण करा” हा पर्याय निवडा.
तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.
“Send OTP” वर क्लिक करा आणि आधारशी लिंक मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit करा.
त्यानंतर जात प्रवर्ग निवडा आणि खालील दोन घोषणांची पुष्टी करा
माझ्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही सरकारी सेवेत कायम नाहीत आणि निवृत्तीवेतन घेत नाहीत.
माझ्या कुटुंबातील फक्त १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
शेवटी “Submit” बटणावर क्लिक करा.
स्क्रीनवर “ Success तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
राज्यातील दोन कोटींपेक्षा अधिक महिला घेतायत लाभ
ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली असून आजपर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त महिला लाभार्थी आहेत. राज्यभरात काही ठिकाणी गैरप्रकार समोर आल्यानंतर शासनाने e-KYC प्रक्रिया सक्तीची केली आहे, जेणेकरून पात्र महिलांनाच लाभ मिळेल.
महत्वाचं आवाहन
18 नोव्हेंबर 2025 नंतर e-KYC न केल्यास
“लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ तात्पुरता थांबवला जाईल.”
म्हणूनच सर्व पात्र लाभार्थींनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

