- Home
- Maharashtra
- Police Bharati 2025: महाराष्ट्रात पोलीस भरतीला सुरुवात! तब्बल 15,631 पदांसाठी अर्ज सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Police Bharati 2025: महाराष्ट्रात पोलीस भरतीला सुरुवात! तब्बल 15,631 पदांसाठी अर्ज सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Police Bharati 2025: महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अंतर्गत एकूण 15,631 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. शिपाई, चालक, बँडस्मन, एसआरपीएफ अशा विविध पदांसाठी इच्छुक उमेदवार 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान अर्ज करू शकतात.

युवकांसाठी आनंदाची बातमी
पुणे: राज्यातील हजारो युवकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ला सुरुवात झाली आहे. एकूण 15,631 पदांसाठी भरती प्रक्रिया 29 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना आता अर्ज करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
ही भरती शिपाई, चालक, बँडस्मन, कारागृह शिपाई आणि एसआरपीएफ अशा विविध पदांसाठी करण्यात येत आहे. यासंबंधी सविस्तर माहिती महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पोलीस भरती 2025, पदनिहाय जागांची संख्या
पोलीस शिपाई: 12,399
चालक शिपाई: 234
सशस्त्र पोलीस शिपाई: 2,393
कारागृह शिपाई: 580
बँडस्मन: 25
एकूण: 15,631 पदे
अर्ज करण्याची तारीख
अर्ज प्रक्रिया सुरू: 29 ऑक्टोबर 2025
शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
policerecruitment2025.mahait.org येथे लॉगिन करावे.
विशेष संधी
यंदा सरकारने 2022 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा पूर्ण झालेल्या उमेदवारांनाही संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वर्षीची भरती विशेष ठरणार आहे.
निवड प्रक्रिया, दोन टप्प्यांत परीक्षा
या वर्षी पोलीस भरतीची प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे.
शारीरिक चाचणी (50 गुण)
धाव, उडी, गोळाफेक अशा घटकांचा समावेश
पात्र ठरण्यासाठी किमान 50% गुण आवश्यक
लेखी परीक्षा (100 गुण)
मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुद्धिमापन चाचणी
पात्रतेसाठी किमान 40% गुण आवश्यक
दोन्ही परीक्षांचे मिळून एकूण 150 गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
मागील वर्षाची पार्श्वभूमी
मागील वर्षी महाराष्ट्रात 18,000 हून अधिक पदांसाठी पोलीस भरती पार पडली होती. यंदाही ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील तरुणाईसाठी ही मोठी रोजगाराची संधी ठरू शकते.
महत्त्वाची सूचना
भरतीसंबंधित माहिती किंवा अपडेट्ससाठी केवळ अधिकृत संकेतस्थळावरच विश्वास ठेवा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून भरतीशी संबंधित आश्वासनं किंवा व्यवहार टाळा.
स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हीच योग्य वेळ
29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सुरू राहतील.
पोलीस दलात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हीच योग्य वेळ आहे!

