केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी आरोपी सियाला तिच्या राहत्या घरी आणण्यात आले होते. यानंतर पोलिसांसोबत घराबाहेर पडताना सियाने मीडियाला पाहून अश्लील हावभाव केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

मुंबई : केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी सिया गोयल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लोणावळा पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने पुण्यातील तिच्या राहत्या घरी नेले होते. घराबाहेर पडताना सियाने मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर कथित अश्लील हावभाव केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर तिच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

तपासासाठी पोलिसांनी पुण्यातील घरी नेले

केतन अग्रवाल याला 18 जून रोजी लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि आरोपी चेतन चौधरी याला अटक करण्यात आली आहे. सध्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अशातच पोलीस कोठडीदरम्यान, 2 जुलै रोजी लोणावळा पोलिसांनी सिया गोयलला तिच्या घरी नेले. घटनेच्या दिवशी तिने परिधान केलेले कपडे जप्त करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

मीडियाचे कॅमेरे पाहताच कथित अश्लील हावभाव

पुण्यातील घरातून सिया बाहेर पडली. येथे मीडियाचे कॅमेरे दिसताच सिया गोयलने कथित अश्लील हावभाव केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीच्या या वागणूकीवर सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे. 

सोशल मीडियावर संताप

व्हायरल व्हिडीओनंतर सिया गोयलच्या हावभावावर सोशल मीडियात तिच्यावर टीका केली जात आहे. अनेकांनी तिच्या कथित अश्लील हावभावावर प्रश्न उपस्थित केले आहे. याशिवाय सियावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास लोणावळा पोलीस अधिक सखोलपणे करत आहेत. या प्रकरणातील पुढील तपास वेगाने सुरू आहे.