संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार ३४ वर्षांनी विधानभवनात का आले होते आणि तिथे काय घडले, याचा खुलासा करत आव्हाड यांनी राऊतांच्या टीकेमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

संजय राऊत हे कायमच काही न काही कारणानं चर्चेत येत असतात. आता शरद पवार यांच्यावर राऊत यांनी टीका केल्याचं दिसून आलं. यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी उत्तर देताना आव्हाड यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

शरद पवार विधानभवनात का आले?

शरद पवार हे ३४ वर्षांनी विधानभवनात आले होते. बेळगावप्रश्नी मीटिंग झाल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत आम्ही जवळच्या केबिनमध्ये जाऊन पोहचलो. त्यावेळी त्या केबिनमध्ये जाऊन बसायचा आमचा कोणताही हेतू नव्हता. साहेबांसाठी जे जवळ होतं, चालायला योग्य होत तिथं आम्ही सर्वांनी जायचा निर्णय घेतला होता.

राजकारणात वैर काही कामाचं नाही 

राजकारणात वैर हे काही कामाचं नसतं. असं वैर केलं तर ते काही कामाचं नसत. राऊत यांना अचानक एवढी पोटदुखी का झाली? आमच्या बोलण्यात असा कोणताच राजकीय अँगल नव्हता. ते आले, त्यांनी साहेबांच्या अंगावर एक शाल टाकून सत्कार केला आणि निघून गेले. अहो राऊत साहेब त्या दोघांमध्ये एका शब्दाचा संवाद झाला नसल्याचं यावेळी आव्हाड यांनी सांगितलं