आयएएस तुकाराम मुंढे यांच्या परिवाराला देखील त्यांच्या बदल्याचा त्रास सहन करावा लागतो, पण हा त्रास असल्याचं तुकाराम मुंढे यांनी आतापर्यंत म्हटलेलं नाही, आपण पब्लिक सर्वन्ट आहोत हे होणारच आणि आणखी खूप काही बोलून गेले आहेत तुकाराम मुंढे, संपूर्ण बातमी वाचा 

मुंबई : आयएएस तुकाराम मुंढे यांच्या 25 बदल्या त्यांच्या 21 वर्षाच्या करिअरमध्ये झाल्या. तुकाराम मुंढे यांच्या सतत बदल्या होत असल्याने मुलाच्या शाळा खूप बदलतात. ज्या ठिकाणी, ज्या शहरात त्यांचं पोस्टिंग होतं, त्या ठिकाणी त्यांच्या मुलाला शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. यामुळे त्यांच्या मुलाचे शाळेत मित्र होत नाहीयत. वर्ग मित्रांशी ओळख होते, कुठे तरी त्यांचा मुलगा त्या शाळेच्या वातावरणात रुळायला लागतो, त्याआधीच त्यांची बदली होते. तुकाराम मुंढे यांच्या मुलाच्या पाचवीपर्यंत तब्बल सहा वेळेस शाळा बदलल्या. तुकाराम मुंढे यांच्या मुलाला पाचवी पर्यंत एका शाळेत एका वर्षापेक्षा जास्त काळ शिक्षण घेता आलेलं नाही.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

बदली झाली की मुलगा पहिला प्रश्न हा विचारतो?

मुंबई, सोलापूर, नवी मुंबई, पुणे, नाशिक यानंतर पुन्हा मुंबई येथे तुकाराम मुंढे याची बदली झाली, यामुळे त्याला एक कल्चरल शॉक बसल्याचं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या मुलाला मुंबईत शाळेसाठी स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तो स्थिरावला आहे. पण तुकाराम मुंढे यांची पहिली बदली जेव्हा होते, तेव्हा त्यांचा मुलाचा त्यांना पहिला प्रश्न हा असतो, तुमच्या बरोबर मला यायचं आहे का, मला माझी शाळा बदलायची आहे का? अशा वेळेस अतिशय कठीण परिस्थिती असते, तर तुकाराम मुंढे यावर म्हणतात, मला हे फेस करावं लागतं.

मलाही भावना आहेत, आतल्या आत दुखावतो

माझ्या मुलाला मित्रांचा गोतावळा, किंवा जवळचे मित्र जमवता आलेले नाहीत. पण हे सर्व सहन करावं लागतं, याची मला खंत वाटते, निश्चितच वाटते, पण याचं प्रदर्शन नको आहे, कारण पब्लिक सर्वन्ट आहोत, तर हे सहन करावं लागेल. कारण एक भूमिका आपण घेतली आहे, तर ती सेवेसाठी पार पाडावी लागेल. पण एक लोक सेवक म्हणून आपण जेव्हा काम करत असतो, तेव्हा एक मोठी खंत असते, मी देखील माणूस आहे, रोबोट नाही, मला देखील भावना आहेत, पण भावनांच्या आहारी न जाता, मी काम करत असतो. पण पब्लिक सर्वंट असल्याने याचा बावू करणे योग्य नाहीय, असं ही तुकाराम मुंढे म्हणतात.

बदली पुन्हा पुन्हा होते म्हणून ती ...

तुकाराम मुंढे यांना कोणत्या विभागात, किती किती महिने काम करता आले, हे आठवत नाही, कारण त्यांच्या बदल्याच एका वर्षाच्या आत झाल्या. आमच्या सतत बदल्या होतात, म्हणून माझ्या पत्नीने पुन्हा सामान बांधा आणि पुन्हा सोडा, असं टाळण्यासाठी जेवढं आहे तेवढंच हवं आहे, तेवढंच सोबत घ्यायचं, हे आमचं नेहमीचं ठरलेलं आहे, असंही तुकाराम मुंढे सांगतात. मी याबाबतीत लकी आहे की, माझं संपूर्ण कुटूंब माझ्या सोबत आहे, जरी माझ्यामुळे त्यांना खूप काही भोगावं लागतं.

मी अनेक ठिकाणी काम केलं, त्या अनुभवाचा मला खूप मोठा फायदा झाला, सेल्स टॅक्स विभागाला त्यांना 2 वर्षापेक्षा जास्त दिवसांचा कालावधी मिळाला, तर एफडीएला यापेक्षा जास्त दिवस मिळावेत अशी अपेक्षा असल्याचं तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय.