Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगे आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार

| Published : Jul 24 2024, 10:42 AM IST / Updated: Jul 24 2024, 10:43 AM IST

Manoj Jarange Patil Hunger Strike

सार

Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.

 

Manoj Jarange Hunger Strike : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. मात्र बुधवारी मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यांनी यावेळी बोलताना त्यांचे कारण देखील सांगितले आहे. मनोज जरांगे यांची तब्येत ढासळल्याने त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आणि उपचार घेण्याचा सलाईन लावण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर बुधवारी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती दिली आहे.

'सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही'

यावेळी जरांगे म्हणाले, मी उपोषण करायला तयार आहे. मात्र गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही. खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही. उपचार बंद करा मी उपोषण करायला तयार आहे, असंही जरांगेंनी पुढे म्हटले आहे. तर सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेले बरं असंही जरांगेंनी म्हटले आहे.

सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरत आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतात मला उपोषण करू द्या म्हणून मी गावकऱ्यांना म्हणत होतो. रात्री गावकऱ्यांनी ऐकले नाही त्यांनी मला सलाईन लावले. सलाईनवर पडू न राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा उपोषण न केलेले बरं या मतावर मी आलो आहे. तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदारसंघाची तयारी करेल असेही जरांगे पुढे म्हणालेत.

'विधानसभा निवडणुकीची तयारी करणार'

या ठिकाणी पडून राहण्यापेक्षा पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली बरी. सरकारचा ज्या सत्तेत आणि खुर्चीत जीव आहे, त्यांच्यासाठीच्या तयारीला आपण लागले पाहिजे. सभा, कार्यक्रम, निवडणुका, दौरे, कोणाला निवडून आणायचे कोणाला पाडायचे, कोणते आमदार विरोधात बोलत आहेत, कोणते खासदार विरोधात बोलत आहोत त्यांचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे, एकच सांगतो मराठा समाजाला कधीही भाजप सत्तेवर येऊ देऊ नका. म्हणून इथं उपचार घेत उपोषण करण्यापेक्षा एक दोन दिवस उपचार घेऊन तयारीला लागणार आहे. बुधवारी दुपारी बारा वाजता मी उपोषण स्थगित करणार आहे, अशी माहिती जरांगेंनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मनोज जरांगे यांची फडणवीसांवर जहरी टीका

बीडच्या नेत्याचे पण तसेच केले त्यांच्याच बापाने भाजप वाढवली त्यांनाच पाय खाली चिरडले. ज्याच्या बापाने भाजप वाढवले त्यांनाच या देवेंद्र फडणवीसांनी संपवले, मराठ्यांच्या ओडताणीमुळे त्यांचा दहा वर्षाचा वनवास तरी संपला. हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात एवढ्या नीचपणाने सत्ता आणून तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळल्याने चालली आहे. जरांगेंची शुगर 62 तर बीपी 98 पर्यंत गेला आहे. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमधून ही बाब समोर आली आहे. जरांगेंची सर्व तपासणी करणाऱ्या डॉ. पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मनोज जरांगे यांनी सध्या उपचार घेण्याची खूप जास्त गरज असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहेत. जरांगेंनी असे न केल्यास ते बेशुद्ध होवू शकतात, असे डॉक्टर म्हणालेत.

आणखी वाचा : 

शरद पवार प्रकाश आंबेडकरांच्या व्हीबीएच्या 'आरक्षण बचाव यात्रे'त सहभागी होणार?