चाळीसगाव तालुक्यातील मोरदड येथील जगदीश ठाकरे या तरुणाचा मित्रांनी खून करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिला. ३० जून रोजी मित्रांसोबत बाहेर गेलेला जगदीश परतलाच नाही. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नातेवाईक, मित्र आणि जवळच्या नातेवाईकांकडून घातपाताचे प्रकरण वाढत चालले आहेत. कन्नड घाटात गावातील तरुणांनीच त्याच्या मित्राचा खून केला आहे. धुळ्यातील चाळीसगाव तालुक्यातील मोरदड येथील रहिवासी असणाऱ्या जगदीश ठाकरे याचा खून झाला. त्याचा मृतदेह हत्या केल्यानंतर कन्नड घाटात फेकून दिला. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील मोरदड येथील रहिवासी असणाऱ्या जगदीश ठाकरे हा ३० जून रोजी गावातील मित्रांसोबत बाहेर गेला होता. त्याच्यासोबत आरोपी शुभम सावंत आणि अशोक सावंत हे यावेळी त्याच्यासोबत होते. त्या दोघांसोबत जगदीश गेल्यानंतर तो परत मागे आलाच नाही. त्यानंतर तो हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.

कुटुंबीयांनी मुलाचा मृतदेह पाहून फोडला हंबरडा 

त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये एक मृतदेह असून तो जगदीशचा आहे का हे पाहण्यासाठी कुटुंबियांना बोलावण्यात आले. त्यांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर तो आपल्या मुलाचाच असल्याचं कुटुंबीयांनी दिसून आलं. संशयित आरोपींची तपासणी पोलिसांच्या वतीने करण्यात येणार आहे. या खुनामागे नेमकं काय कारण आहे त्याच पोलीस तपास करणार आहेत.