- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert: पुढील २४ तास महाभयानक; राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा धोका, हवामान विभागाचा यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert: पुढील २४ तास महाभयानक; राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा धोका, हवामान विभागाचा यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert: हवामान विभागाने २३ ऑगस्ट रोजी विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाचा यलो अलर्ट जारी केला. कोकणात मध्यम पाऊस पडण्याची शक्यताय तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र असले तरी पुन्हा एकदा हवामान विभागाने गंभीर इशारा दिला आहे. २३ ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विशेषत: विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/PrUAkm3QvF
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 22, 2025
कुठे किती पाऊस?, राज्यातील हवामानाचा आढावा
विदर्भात यलो अलर्ट
हवामान विभागाने नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या ११ जिल्ह्यांमध्ये वीजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात पावसाची शक्यता कायम
मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरांत पावसाची स्थिती काहीशी स्थिर असून, काही भागांत मध्यम पावसाचे संकेत मिळत आहेत.
मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत हलक्याप्रकारच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मराठवाड्यात ढगांची गर्दी आणि हलका पाऊस
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलकासा पाऊस पडू शकतो, मात्र कोणताही विशेष अलर्ट सध्या जारी केलेला नाही.
नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना
वीजांचा कडकडाट आणि वादळी वारे पाहता घराबाहेर पडताना काळजी घ्या.
ओले रस्ते, झाडांची पडझड आणि विजेचे खांब टाळा.
शेती आणि बाहेरील कामांमध्ये सुरक्षा नियम पाळावेत.
हवामान खात्याचा इशारा
राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर ओसरला असला तरी विदर्भात हवामानाने पुन्हा तडाखा देण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असून, विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २३ ऑगस्टसाठी हवामान विभागाचा अलर्ट लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती तयारी ठेवावी आणि अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवावे.

