उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या संभाव्य पक्षबदलामुळे शिंदे गटाचे संख्याबळ १३ वर पोहोचेल, तर ठाकरे गटाकडे केवळ ३ खासदार उरतील, ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतील.

मागील २४ तासांपासून राजकारणात विविध घडामोडी घडल्या आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ६ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळं शिंदे हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचं दिसून आलं आहे. आपण २०२४ लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या होत्या ते जाणून घेऊयात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

२०२४ लोकसभा निवडणूक 

२०२४ लोकसभा निवडणूक अतिशय रंगतदार झाली होती. यावेळी महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागांवर दमदार विजय मिळवला होता. त्यावेळी सत्ताधारी महायुतीला फक्त १७ जागा जिंकता आल्या होत्या. आता मात्र उद्धव ठाकरे गटाचे खासदार बदलल्यानंतर चित्र पूर्णपणे बदलून गेलं आहे.

कोणत्या पक्षाकडं किती खासदार? 

आपण आता कोणत्या पक्षाकडे किती खासदार आहेत हे जाणून घेणार आहोत. ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला खिंडार पडले आहे. त्यांच्या खासदारांची संख्या आता ३ वर आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे संख्याबळ हे ७ वरून १३ वर जाऊन पोहचले आहे. सध्याच्या घडीला महायुतीचे २३ आणि महाविकास आघाडीचे २५ खासदार आहेत.

खासदारांची संख्या 

काँग्रेस - १४ खासदार शिवसेना - शिंदे गट १३ खासदार भाजप - ९ खासदार NCP - शरद पवार गट ८ खासदार शिवसेना - ठाकरे गट ३ खासदार