बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना किती दिवसांमध्ये लिहिली होती?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला, ज्याला २ वर्ष ११ महिने १८ दिवस लागले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते अंमलात आले.
- FB
- TW
- Linkdin
)
बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना किती दिवसांमध्ये लिहिली होती?
भारतीय राज्यघटनेचा मसुदा ड्राफ्टिंग कमिटी ने तयार केला होता. ही समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते
भारतीय राज्यघटना कोणी लिहिली होती?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांची जयंती १४ एप्रिल रोजी साजरी केली जाते.
भारतीय संविधान लिहायला किती वेळ लागला?
भारतीय संविधान लिहायला २ वर्ष ११ महिने १८ दिवस इतका कालावधी लागला होता. या कालावधीमध्ये विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास करण्यात आला.
संविधान सभा कधी स्थापन झाली?
संविधान सभेची स्थापना ९ डिसेंबर १९४६ रोजी करण्यात आली. यावेळी संविधान सभेचे ३८९ सदस्य होते.
ड्राफ्टिंग कमिटी कधी स्थापन झाली?
ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना २९ ऑगस्ट १९४७ रोजी झाली होती. या कमिटीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
राज्यघटनेचा मसुदा कधी मांडला?
4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेपुढे भारतीय राज्यघटनेचा मसुदा मांडला. भारतीय राज्यघटनेचा मसुदा ड्राफ्टिंग कमिटी ने तयार केला होता.
भारतीय संविधान कधी स्वीकारलं?
भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आलं होत. याच दिवशी "संविधान दिवस" साजरा केला जातो.
भारतीय संविधान कधी अंमलात आलं?
भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले होते. त्यानंतर भारत हा प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जाऊ लागला.