महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: २८८ मतदारसंघासाठी किती उमेदवारांनी भरले अर्ज?

| Published : Oct 30 2024, 11:52 AM IST

maharashtra vidhansabha
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: २८८ मतदारसंघासाठी किती उमेदवारांनी भरले अर्ज?
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपली असून, ७९९५ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये १०९०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीचा निकाल २० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र विधासंभ निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. यावेळी निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वच पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत २० नोव्हेंबरला निकाल जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणुकांचा अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि आणि पक्षांची चांगलीच गडबड उडाली आहे. 

७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात 
यावेळी निवडणुकीत ७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात अखेरच्या एका दिवसात 4 हजार 996 उमेदवारांचे एकूण 6 हजार 484 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता राज्यातील 288 मतदारसंघांत एकूण 7 हजार 995 उमेदवारांचे 10 हजार 905 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशी माहिती विधानसभेच्या मुख्याधिकाऱ्यानी दिला आहे. 

आचारसंहिता कधी सुरु झाली? - 
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार 29 ऑक्टोबर 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. यानंतर आज 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. यानंतर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल.