ऐकायला कमी येत असूनही हरिभाऊ बागडे राजकारणात सक्रिय कसे?

| Published : Jul 28 2024, 11:16 AM IST

haribhau bagade

सार

हरिभाऊ बागडे हे मराठवाड्यातील एक प्रमुख नेता असून भाजपाने त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ग्राउंडपासून काम करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 

मराठवाड्यातील मोठे नेते म्हणून हरिभाऊ बागडे यांची ओळख आहे. त्यांची भाजपाने राजस्थान येथील राज्यपाल म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच राजकारणात आणि समाजकारणात त्यांच योगदान मोठं राहिले आहे. आपण त्याच हरिभाऊ यांची या ब्लॉगमध्ये माहिती समजून घेऊयात. हरिभाऊ यांनी त्यांच्या करिअरमध्ये ग्राउंडपासून काम करून स्वतःची ओळख तयार केली. 

शाळेत गेलेले पहिलेच होते - 
हरिभाऊ बागडे यांना नाना म्हणूनही ओळखले जाते. औरंगाबाद पासून त्यांचे गाव जवळच असून औरंगाबाद पासून १६ किलोमीटर अंतरावर त्यांचे गाव आहे. हरिभाऊ हे त्यांच्या घरातील शिकलेले पहिले व्यक्ती आहे. दहावी पास झाल्यानंतर त्यांनी वडील आणि भावाच्या पाऊलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. ते पंधरा धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी घालत असायचे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक असल्यापासून त्यांनी समाजकारणात कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर ते तब्बल पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.ते स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेत असत आणि त्यांनी औरंगाबाद येथील घराला कृषियोग असेही नाव दिले आहे. त्यांनी संघाचं मुखपत्र विवेक मध्ये पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या पत्रकार परिषदा कव्हर केल्या आहेत.