सार

संतोष पंडित यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून सरकारी गाड्यांच्या गैरवापराबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना गाडीत बसणारे लोक स्पष्टपणे उत्तर देऊ शकत नसल्याचे दिसून आले, ज्यामुळे लोकांनी असंतोष व्यक्त केला आहे.

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर सरकारी अधिकाऱ्यांची अनेक प्रकरण उघडकीस आली. सांगली - मिरज महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांचे आदिवासी विभागात असताना केलेला भ्रष्टाचार न्यूजपेपरच्या माध्यमातून प्रकाशझोतात आला होता. आपल्या आजूबाजूला महाराष्ट्र शासन, पोलीस अशी नाव लिहिलेल्या अनेक गाड्या आजूबाजूला दिसत असतात. याच गाड्यांच्या बाबत संतोष पंडित या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरने आवाज उठवला आहे. 

संतोष पंडित यांचा व्हिडीओ व्हायरल - 
संतोष पंडित यांचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यांनी या हिडिओंमध्ये पोलीस किंवा महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या गाड्यांच्या मालकांना गाडी कोणाची आहे हा प्रश्न विचारायला सुरुवात केली. एका व्हिडिओमहदये ते महाराष्ट्र शासन लिहिलेल्या गाडीच्या जवळ जातात, तेथे गेल्यानंतर ते गाडी कोणाची आहे असं विचारतात. गाडी लँड रेकॉर्ड विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याची असल्याची माहिती देतो. 

साहेब कुठे आहेत असं विचारल्यावर गाडीत बसलेला ड्रायव्हर साहेबांच्या सुंबाईला क्लासला घेऊन आलो असल्याचे उत्तर देतात. त्यानंतर गाडी पुढे निघून जाते. सोशल मीडियामधून संतोष पंडित यांनी विचारलेल्या प्रश्नांना गाडीत बसणारे लोक किंवा ड्रायव्हर स्पष्टपणे उत्तर देऊ शकत नसल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर ते गाडी तशीच ठेवून निघून जातात. 

लोकांनी या व्हिडिओवर असंतोष व्यक्त करत कमेंट करायला सुरुवात केली आहे. राजकारणी लोकांना माज आला आहे, धन्यवाद अशा स्वरूपाच्या कमेंट यावर लोकांनी केल्या आहेत. संतोष पंडित हे इंस्टाग्राम आणि युट्युबवर व्हिडिओ बनवत असून त्यांना जवळपास ७  लाख ५०  हजार युट्युबवर सबस्क्राइबर आहेत. 
आणखी वाचा - 
बदलापूर अत्याचार: मुलींवर 15 दिवसांपासून अत्याचार, समितीचा धक्कादायक निष्कर्ष