MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • तुमच्याकडे जमीन आहे? मग हे वाचाच! सरकारचा मोठा निर्णय, जमिनीशी संबंधित ११ कागदपत्रे आता मिळणार एका क्लिकवर

तुमच्याकडे जमीन आहे? मग हे वाचाच! सरकारचा मोठा निर्णय, जमिनीशी संबंधित ११ कागदपत्रे आता मिळणार एका क्लिकवर

E Hakk System For Land Records : राज्य सरकारने ‘ई-हक्क’ प्रणाली सुरू केली असून, यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. या प्रणालीद्वारे जमिनीशी संबंधित ११ महत्त्वाचे फेरफार आता घरबसल्या ऑनलाईन करता येणार आहेत. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Jan 12 2026, 07:22 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
तलाठ्याचे फेरे वाचले! जमिनीचे 'हे' ११ फेरफार आता घरबसल्या होणार
Image Credit : Getty

तलाठ्याचे फेरे वाचले! जमिनीचे 'हे' ११ फेरफार आता घरबसल्या होणार

मुंबई : शेतकरी आणि जमीनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत राज्य सरकारने ‘ई-हक्क’ प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली आहे. महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या नव्या डिजिटल व्यवस्थेमुळे जमिनीशी संबंधित अनेक प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन झाल्या असून, नागरिकांचा वेळ, पैसा आणि त्रास वाचणार आहे. 

25
तलाठी कार्यालयाचे फेरे आता इतिहासजमा
Image Credit : ChatGPT

तलाठी कार्यालयाचे फेरे आता इतिहासजमा

यापूर्वी सातबारा उताऱ्यात बदल, फेरफार नोंदी, वारस नोंद, गहाणखत किंवा इतर जमीनविषयक कामांसाठी नागरिकांना तलाठी व महसूल कार्यालयात वारंवार जावे लागत होते. कागदपत्रांची पडताळणी, अर्जांतील विलंब आणि अनावश्यक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र ई-हक्क प्रणालीमुळे या सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्या असून, अर्ज थेट डिजिटल स्वरूपात दाखल करता येणार आहेत. नागरिक महा ई-सेवा केंद्रांमार्फत या सुविधांचा सहज लाभ घेऊ शकतात.

Related Articles

Related image1
MHADA Kokan Lottery 2026 : मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! अर्ज भरण्याची तारीख आणि ठिकाणं पाहा एका क्लिकवर
Related image2
बुधवारपासून लॉंग विकेंडची संधी, सलग 5 दिवस मिळतील सुट्या, असे करा प्लानिंग
35
ई-हक्क प्रणालीचा नेमका उद्देश काय?
Image Credit : Asianet News

ई-हक्क प्रणालीचा नेमका उद्देश काय?

सातबारा उताऱ्यातील अडचणी कमी करणे आणि फेरफार नोंदींसाठी लागणारा कालावधी मोठ्या प्रमाणात घटवणे, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. अर्ज स्वीकारण्यापासून ते अंतिम नोंद होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत करण्यात आली आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होणार असून, चुका, गैरसमज आणि तक्रारींवर नियंत्रण मिळणार आहे. विशेष म्हणजे, अर्जदाराला आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करता येणार आहे.

45
‘अॅग्रीस्टॅक’मुळे शेतकऱ्यांना युनिक ओळख
Image Credit : Getty

‘अॅग्रीस्टॅक’मुळे शेतकऱ्यांना युनिक ओळख

याचबरोबर शासनाने ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेंतर्गत युनिक फार्मर आयडी देण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. या आयडीमुळे भविष्यात कर्ज, पीकविमा, अनुदान किंवा शासकीय योजनांचा लाभ घेताना वेगवेगळे उतारे व कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. एकाच ओळख क्रमांकावर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार असल्याने कामकाज अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.

55
कोणती 11 कागदपत्रे व सेवा ऑनलाईन मिळणार?
Image Credit : Asianet News

कोणती 11 कागदपत्रे व सेवा ऑनलाईन मिळणार?

ई-हक्क प्रणालीअंतर्गत खालील 11 महत्त्वाच्या जमीनविषयक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जमीन खरेदी-विक्री फेरफार नोंद

वारसाहक्क नोंदणी

कौटुंबिक वाटणी (Partition Mutation)

न्यायालयीन आदेशावर आधारित नोंदी

बोजा चढविणे किंवा कमी करणे

गहाणखत नोंद

ई-करार नोंदणी

संपत्ती हक्क हस्तांतरण

मृत व्यक्तीचे नाव कमी करणे

एकत्र कुटुंब नोंद कमी करणे

अपाक शेरा व विश्वस्ताचे नाव कमी करणे

या सुविधांमुळे जमीन व्यवहार अधिक सोपे, जलद आणि पारदर्शक होणार आहेत.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
बुधवारपासून लॉंग विकेंडची संधी, सलग 5 दिवस मिळतील सुट्या, असे करा प्लानिंग
Recommended image2
जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर, राज्य निवडणूक आयोगाच्या शिफारशीवर सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ
Recommended image3
BJP Congress Alliance : रावेर नगरपरिषदेत आज मोठी राजकीय उलथापालथ? उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजप–काँग्रेस युतीची जोरदार चर्चा
Recommended image4
Pune Municipal Election 2026 : पुणे महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस? चार प्रभागांत खर्च १२० कोटींवर जाण्याची चर्चा
Recommended image5
Ladki Bahin Yojana: महापालिका निवडणुकीआधी ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे देण्याचा दावा; निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना खुलाशाचे आदेश
Related Stories
Recommended image1
MHADA Kokan Lottery 2026 : मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! अर्ज भरण्याची तारीख आणि ठिकाणं पाहा एका क्लिकवर
Recommended image2
बुधवारपासून लॉंग विकेंडची संधी, सलग 5 दिवस मिळतील सुट्या, असे करा प्लानिंग
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved