सार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटप झाले असले तरी काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. शिवसेना (९६), काँग्रेस (१०२) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (८७) यांना जागा वाटप झाल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आतापर्यंत जागावाटप झाले आहे. शिवसेना पक्षाने ९६, काँग्रेस १०२, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला ८७ जागा देण्यात आल्यात. यावेळी आता काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार असून आता येथे महाविकास आघाडी काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष आलं आहे. आता यामध्ये कोणता पक्ष माघार घेत याकडे लक्ष द्यायला हवं.
महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत कोठे होणार?
मिरज -
शिवसेना ठाकरे गट -तानाजी सातपुते
काँग्रेस - मोहन वनखंडे
सांगोला -
शिवसेना ठाकरे गट दीपक आबा साळुंखे
शेकाप - बाबासाहेब देशमुख
दक्षिण सोलापूर
काँग्रेस - दिलीप माने
शिवसेना ठाकरे गट - अमर पाटील
पंढरपूर
काँग्रेस भागीरथ भालके
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अनिल सावंत
परांडा
शिवसेना ठाकरे गट रणजीत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -राहुल मोटे
दिग्रस
शिवसेना ठाकरे गट - पवन जैस्वाल
काँग्रेस -माणिकराव ठाकरे