आज 16 ऑगस्टला बँका बंद आहेत का? जन्माष्टमीची सुट्टी आहे का? जाणून घ्या
मुंबई - स्वातंत्र्यदिनानंतर जन्माष्टमीला बँका उघड्या राहतील का याबाबत संभ्रम आहे. १६ आणि १७ ऑगस्ट रोजी बँकांच्या सुट्ट्यांबद्दल माहिती जाणून घ्या. कोणत्या राज्यात बँका उघड्या आणि कोणत्या राज्यात बंद राहतील ते पाहा.

स्वातंत्र्यदिनाला कामे रखडली
काल स्वातंत्र्यदिन होता. त्यामुळे देशभरातील सर्व बँका बंद होत्या. अनेकांची कामे अपूर्ण राहिली. ऑनलाइन सुविधा असल्या तरी बँकेत जावे लागते. काल बँका बंद असल्याने कामे रखडली.
तीन दिवस बॅंका बंद?
स्वातंत्र्यदिनानंतर लगेचच जन्माष्टमी. १६ ऑगस्टला बँका उघड्या राहतील का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. १६ ऑगस्टला शनिवार आहे. म्हणजे सलग तीन दिवस बँका बंद राहणार का? की फक्त सरकारी बँका बंद राहतील?
ऑगस्टमध्ये अनेक सण
ऑगस्ट महिन्यात अनेक सणांमुळे बँकांना सुट्ट्या असतात. रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण येतात. त्यामुळे बॅंका बंद राहतील तर खुल्या राहतील असा प्रश्न सर्वांना पडतो.
या राज्यांमध्ये आज बॅंका बंद
शनिवारी काही राज्यांमध्ये बँका बंद असतील, तर काही राज्यांमध्ये उघड्या राहतील. १६ ऑगस्टला गुजरात, मिझोरम, मध्य प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू, उत्तराखंड, सिक्कीम, तेलंगणा, राजस्थान, जम्मू, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मेघालय, श्रीनगर आणि आंध्र प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.
कुठे बँका खुल्या?
शनिवार तिसरा शनिवार असल्याने त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, केरळ, नागालँड, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, गोवा, हिमाचल प्रदेशमध्ये सर्व सरकारी आणि खाजगी बँका उघड्या राहतील. त्यामुळे लोकांना कामे करता येतील.
ऑगस्टमधील सुट्यांचे वेळापत्रक
१९ ऑगस्टला महाराज वीर विक्रम किशोर मानिक्य बहादूर यांच्या जयंतीनिमित्त त्रिपुरामध्ये सुट्टी.
२३ ऑगस्टला चौथा शनिवार असल्याने सुट्टी.
२४ ऑगस्टला रविवार.
२५ ऑगस्टला श्रीमंत शंकरदेव यांच्या जयंतीनिमित्त आसाममध्ये सुट्टी.
२७ ऑगस्टला गणेश चतुर्थीनिमित्त गुजरात, पुणे, मुंबई, नागपूर, कर्नाटक, ओडिशा, चेन्नई, हैदराबाद, गोवा, आंध्र प्रदेशमध्ये बँका बंद.