शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाला भेट दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवरून संजय राऊत यांनी टीका केली असता, शिंदे यांनी 'पोटात दुखणाऱ्यांसाठी आपला दवाखाना आहे' असा टोला लगावला. 

सध्याच्या घडीला राजकारणात एकमेकांवर टीका केली जात आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगताना दिसून येत आहे. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनात प्रवेश केला. त्यानंतर शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. या घटनेबद्दल राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर आव्हाड यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पोटात दुखणाऱ्यांसाठी आपला दवाखाना चालू केलाय 

पोटात दुखणाऱ्यांसाठी आपला दवाखाना सुरु केला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राऊत यांच्यावर टीका केली. राजकीय संस्कृती जपण्यासाठी आम्ही भेट घेतल्याचं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे राज्याचे जेष्ठ नेते आहेत. त्यामुळं त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही गेलो होतो. यामुळं जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी दवाखान्यात जाऊन यावं.

राजकारणातील कद्रूपणाकडे आम्ही दुर्लक्ष करतो 

राजकारणात वाढलेल्या कद्रूपणाकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांना यावेळी राजकीय घडामोडी घडणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी काहीच उत्तर दिल नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात राजकीय घडामोडी काही घडतात का याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.