- Home
- Maharashtra
- Diwali Flight Price Hike: दिवाळीत विमान प्रवासाचं बजेट बिघडलं!, नागपूर-मुंबई तिकीट दर गगनाला भिडले
Diwali Flight Price Hike: दिवाळीत विमान प्रवासाचं बजेट बिघडलं!, नागपूर-मुंबई तिकीट दर गगनाला भिडले
Diwali Flight Price Hike: दिवाळीच्या सुट्टीत रेल्वे, एसटीत गर्दीमुळे प्रवासी हैराण झाले असून खासगी ट्रॅव्हल्सचे दरही वाढले. त्यामुळे अनेक प्रवासी मुंबई-नागपूर मार्गावर, महागड्या विमानसेवेकडे वळतेत, ज्यामुळे विमान तिकिटांचे दर ३ ते ४ पटीने वाढले.

दिवाळीत हवाई प्रवास महागला!
मुंबई: दसरा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रात रेल्वे, एसटी आणि खासगी प्रवास व्यवस्थांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी आणि सण साजरा करण्यासाठी आधीच तिकीट आरक्षण करत असतात. मात्र, यंदा रेल्वेचे आरक्षण महिन्यांआधीच फुल्ल, एसटीत गर्दी आणि खासगी ट्रॅव्हल्सचे तिकिट दर आकाशाला भिडले आहेत. परिणामी, अनेक प्रवाशांनी आता विमानसेवेकडे मोर्चा वळवला आहे.
नागपूर-मुंबई विमानसेवेचा पर्याय लोकप्रिय
पुणे व मुंबईमध्ये शिक्षण व नोकरीसाठी स्थायिक झालेले विदर्भातील नागरिक विशेषतः वणीसारख्या गावांतील दरवर्षी दिवाळीनिमित्त घरी परततात. पूर्वी रेल्वे किंवा एसटीचा पर्याय वापरणारे हे प्रवासी, आता वाढती गर्दी, प्रवासाचा वेळ (१०-१२ तास) आणि जागेचा अभाव यामुळे थेट विमानप्रवास करण्याचे ठरवत आहेत.
वणीवरून पुण्याला फक्त ६ ट्रॅव्हल्सची सेवा आहे, तर मुंबईसाठी एकही थेट सुविधा नाही. त्यामुळे नागपूर विमानतळ हे प्रमुख केंद्र बनले आहे. नागपूरहून मुंबई आणि पुण्याला सकाळ-संध्याकाळ विमानसेवा उपलब्ध असल्यामुळे प्रवासी बुकिंगसाठी विमानसेवेची निवड करत आहेत.
विमान तिकिटांचे दर तीन ते चारपट वाढले
आधी फक्त ₹800 ते ₹1,000 ला मिळणारे ट्रॅव्हल्स तिकीट आता दिवाळीच्या काळात ₹3,000 पेक्षा जास्त झाले आहे. हाच कल विमान तिकिटांमध्येही दिसतोय. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच बुकिंग वाढले असून 18 ऑक्टोबरपासून तिकीट दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
18 ऑक्टोबरच्या आसपास मुंबई-नागपूर विमान दर: ₹14,000+
दिवाळीनंतर (24-27 ऑक्टोबर): नागपूर-मुंबई दर ₹8,000 ते ₹10,000
नागपूर-पुणे: ₹10,000 च्या आसपास
प्रवाशांच्या खिशाला चटका
रेल्वे आरक्षण संपलेले, एसटी गाड्यांमध्ये जागा नाही, ट्रॅव्हल्स कमी, आणि अशा परिस्थितीत प्रवासी हताश होऊन विमानसेवेकडे वळले आहेत. अनेक कुटुंबांना वेळ वाचवण्याच्या आणि गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विमानसेवेचा पर्याय स्वस्त नसलाही, सोयीस्कर वाटतोय.
सणाच्या साजशृंगारात खर्च वाढतोय
दिवाळीसारखा मोठा सण गावी कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी लोक कितीही महाग तिकीट असले तरी ते बुक करत आहेत. मात्र, या खर्चामुळे त्यांच्या एकूण सणाच्या तयारीवर आर्थिक ताण निर्माण होत आहे. विमानाचे आजचे दरच इतके वाढले आहेत की दिवाळीच्या आठवड्यात ते आणखी दुप्पट होण्याची शक्यता आहे.

