सार
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्रात महायुतीचा विधानसभेतील निवडणुकीत मोठा विजय होताना दिसून येत आहे. यावरच देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Devendra Fadnavis on Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्रात आज (23 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळजवळ स्पष्टच होत आहेत. अशात राज्यात महाविकास आघाडी विजयाच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे. यावरच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी म्हटले की, "एक है तो सेफ है, मोदी हैं तो मुमकिन है." याशिवाय मुंबईतील भाजपाच्या कार्यालयातही एक हैं तो सेफ है अशा आशयाचे पोस्टरही लावण्यात आले आहेत. दरम्यान, या घोषणाबाजीसाठी भाजपाने विधानसभेवेळी फार मेहनत केल्याचे दिसून येत आहे.
नागपुरात गुलाल उधळण्यास सुरुवात
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरमधील धरमपेठ येथील निवासस्थानी गुलाल उधळण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या आईंनी त्यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. भाजपा सध्या 127 जागांनी पुढे आहे. जर भाजपाला 120 पेक्षा अधिक जागा मिळवण्यास यश आल्यास हा एक रेकॉर्ड ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार?
महायुतीचा विजय होत असल्याची स्थिती असतानाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का याची देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, "मुख्यमंत्री हा महायुतीचा असेल. ज्या पक्षाच्या जागा अधिक असतील त्यांचाकडीलच चेहरा मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असेल. भाजपकडे 125 च्या आसपास जागा असतील अशी अपेक्षा आहे. खरंतर, देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील."
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले?
विधानसभा निवडणुकीत राज्यातील विजयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, "आम्हाला सर्व वर्गातून मत मिळाली आहेत. महायुतीचे कार्यकर्ते पूर्ण मेहनतीने काम करत होते. आम्हाला असा विजय मिळालाय जो कधीच झाला नव्हता. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकार ज्यावेळी एकत्रित मिळून काम करते त्यावेळी विकास होतो. आपल्या राज्याला केंद्र सरकारने नेहमीच मदत केली आहे."
आणखी वाचा :
Maharashtra Elections 2024: महाविकास आघाडीच्या पराभवाची 10 मोठी कारणे
Maharashtra Elections 2024: NDA च्या प्रचंड विजयाची 'ही' आहेत 10 भक्कम कारणे