महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खातेबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतल्याने त्यांच्या मंत्रिपदाच्या शक्यता वाढल्या आहेत.
पुणे: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्र्यांचे खातेबद्दल होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे कायमच वादग्रस्त विधान करत असल्यामुळं ते वादात सापडले आहेत. मंत्री संजय शिरसाठ हे काही दिवसांपासून चर्चेत येत आहेत. पैशांच्या बॅगशेजारचा शिरसाठ यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
आता एकनाथ शिंदे यांनी एका अज्ञातवासात असणाऱ्या नेत्याची भेट घेतली आहे. त्यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतल्यामुळं त्यांना मंत्रिपद मिळत का याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली आणि याच भेटीमुळं त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या शक्यतांना बळ मिळालं आहे.
तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घरी गेले होते
तानाजी सावंत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे हे घरी गेल्याची माहिती समजली आहे. सध्याच्या राजकारणात मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानामुळे या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळं आता सावंत यांना कोणाच्या जागेवर मंत्रिपद भेटणार हा प्रश्न जनतेला पडला आहे.
माणिकराव कोकाटे राजीनामा देणार?
आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये त्यांची भेट कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत होणार असून ते त्यांचा राजीनामा घेतात का याकडं माध्यमांचं लक्ष लागलेलं आहे. छावा संघटनेनं कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
