MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ! दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस आता सुटणार 'दिवा' स्थानकातून; रेल्वेच्या निर्णयाने प्रवाशांचा संताप

कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ! दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस आता सुटणार 'दिवा' स्थानकातून; रेल्वेच्या निर्णयाने प्रवाशांचा संताप

Dadar-Ratnagiri Express shifted to Diva: रेल्वे प्रशासनाने परिचालन अडचणींमुळे दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस दादरऐवजी दिवा स्थानकातून चालवण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार असून कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 21 2026, 05:33 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ! दादर रत्नागिरी एक्स्प्रेस आता सुटणार 'दिवा' स्थानकातून
Image Credit : Asianet News

कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ! दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस आता सुटणार 'दिवा' स्थानकातून

मुंबई: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक अत्यंत निराशाजनक बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने परिचालन अडचणींचे (Operational Issues) कारण देत दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस आता दादरऐवजी दिवा स्थानकातून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईतून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होणार असून, रेल्वेच्या या 'विचित्र' निर्णयामुळे कोकणवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
नेमकं कारण काय?
Image Credit : ANI

नेमकं कारण काय?

मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, दादरहून सुटणाऱ्या या गाडीमुळे उपनगरीय लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. कोकणातून येणारी ही गाडी दिवा स्थानकात मुख्य मार्गावर आणताना लोकल गाड्या थांबवाव्या लागतात. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी आता या गाडीचा प्रवास दादरऐजी थेट दिव्यावरूनच सुरू होणार आहे. 

Related Articles

Related image1
पुणेकरांचा प्रवास आता सुसाट! स्वारगेट-कात्रज मेट्रो थेट खेड-शिवापूरपर्यंत; 'रिंग रोड'ला जोडणारा मेगा प्लॅन मंजूर
Related image2
Wather Update: सावधान! पुढील ४ दिवस धोक्याचे; महाराष्ट्रासह देशातील 'या' राज्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, गारपिटीचाही इशारा
35
उत्तर भारतीय गाड्यांना झुकते माप?
Image Credit : Social Media

उत्तर भारतीय गाड्यांना झुकते माप?

एकीकडे कोकण रेल्वेच्या गाड्या मुंबईबाहेर ढकलल्या जात असताना, दुसरीकडे दादर-गोरखपूर विशेष एक्स्प्रेस कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. "उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना प्राधान्य आणि कोकणी माणसाच्या सोयीकडे दुर्लक्ष का?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

45
सुरेश प्रभू यांची आक्रमक भूमिका
Image Credit : South Western Railways - SWR

सुरेश प्रभू यांची आक्रमक भूमिका

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही या निर्णयावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "ही चूक तातडीने दुरुस्त करा," अशी मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची आधीच मेल-एक्स्प्रेस गाड्यांची संख्या कमी असल्याने मोठी गैरसोय होत आहे, त्यात या निर्णयामुळे प्रवाशांना आता दादर सोडून दिव्याला जावे लागणार आहे. 

55
प्रवाशांच्या अडचणीत भर
Image Credit : iSTOCK

प्रवाशांच्या अडचणीत भर

अतिरिक्त प्रवास: दादर किंवा मुंबईच्या मध्यवर्ती भागातून प्रवाशांना आता सामानासह दिव्यापर्यंत लोकलने प्रवास करावा लागेल.

विस्कळीत नियोजन: अचानक झालेल्या या बदलामुळे प्रवाशांचे आधीच केलेले आरक्षणाचे नियोजन कोलमडले आहे.

दुजाभाव: कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या थांब्यांमध्ये होत असलेल्या कपातीमुळे रेल्वेवर प्रवाशांचा विश्वास कमी होत आहे.

रेल्वे प्रशासन आपला हा निर्णय मागे घेणार की प्रवाशांना असाच त्रास सहन करावा लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक, 24 जूननंतर दिलासा मिळण्याची शक्यता
Recommended image2
Operation Tiger | ऑपरेशन टायगर यशस्वी? उबाठाच्या बैठकीला हे 6 खासदार गैरहजर, दिल्लीत हालचालींना वेग
Recommended image3
Monsoon Update : महाराष्ट्रातील मान्सूनचा वेग पुन्हा मंदावला; हवामान खात्याकडून पुढील ४ ते ५ दिवसांसाठी महत्त्वाचा अंदाज
Recommended image4
UBT Meeting Today : ऑपरेशन टायगर फसलं तर नाही ना? कोण कुणाबरोबर आणि कोण कुणाबरोबर नाही, आज उबाठाची संसदीय दलाची बैठक, चित्र स्पष्ट होणार
Recommended image5
BEST Bus Strike : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! 19 जूनपासून बेस्ट बससेवा ठप्प होण्याची शक्यता
Related Stories
Recommended image1
पुणेकरांचा प्रवास आता सुसाट! स्वारगेट-कात्रज मेट्रो थेट खेड-शिवापूरपर्यंत; 'रिंग रोड'ला जोडणारा मेगा प्लॅन मंजूर
Recommended image2
Wather Update: सावधान! पुढील ४ दिवस धोक्याचे; महाराष्ट्रासह देशातील 'या' राज्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, गारपिटीचाही इशारा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved