MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Wather Update: सावधान! पुढील ४ दिवस धोक्याचे; महाराष्ट्रासह देशातील 'या' राज्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, गारपिटीचाही इशारा

Wather Update: सावधान! पुढील ४ दिवस धोक्याचे; महाराष्ट्रासह देशातील 'या' राज्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, गारपिटीचाही इशारा

Wather Update: IMD ने देशभरात पावसाचा इशारा दिला असून अनेक राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. येत्या काही दिवसांत पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, गारपीटची शक्यता आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 21 2026, 04:26 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
महाराष्ट्रासह देशातील 'या' राज्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
Image Credit : Gemini AI

महाराष्ट्रासह देशातील 'या' राज्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

नवी दिल्ली: देशातील हवामानात अचानक मोठा बदल झाला असून भारतीय हवामान विभागाने (IMD) संपूर्ण देशासाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, गारपीट आणि ताशी ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
कुठे आहे 'ऑरेंज अलर्ट'?
Image Credit : X

कुठे आहे 'ऑरेंज अलर्ट'?

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अखिल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. या भागात ताशी ६० ते ७० किमी वेगाने वादळी वारे वाहू शकतात, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. 

Related Articles

Related image1
Lipulekh Pass: भारत-चीन सीमा व्यापार ६ वर्षांनी पुन्हा सुरू, व्यापाऱ्यांत उत्साह
Related image2
वाढदिवसाच्या रात्रीच काळाचा घाला! आर.जी. कर रुग्णालयात लिफ्टच्या दरवाजात अडकून तरुणाचा अंगावर काटा आणणारा अंत
37
राज्यानिहाय हवामानाचा अंदाज
Image Credit : X

राज्यानिहाय हवामानाचा अंदाज

महाराष्ट्र आणि दक्षिण भारत

महाराष्ट्रातील काही भाग आणि दक्षिण भारतात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, गोवा, केरळ आणि किनारपट्टीच्या कर्नाटकात उष्ण व दमट हवामान कायम राहील. 

47
उत्तर भारत
Image Credit : Asianet News

उत्तर भारत

दिल्लीत काल झालेल्या पावसामुळे तापमानात घट झाली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २३ मार्च रोजी पाऊस आणि हिमवृष्टीचा (Snowfall) अंदाज आहे. 

57
पूर्व आणि ईशान्य भारत
Image Credit : social Media

पूर्व आणि ईशान्य भारत

पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये २१ ते २४ मार्च दरम्यान मुसळधार पाऊस होऊ शकतो. ओडिशामध्ये गारपिटीची (Hailstorm) दाट शक्यता आहे. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात २४ मार्चला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

67
तापमानात होणार चढ-उतार
Image Credit : social media

तापमानात होणार चढ-उतार

दिल्लीसह उत्तर भारतात आज तापमानात २-३ अंशांची घट होऊ शकते. मात्र, उद्यापासून ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा एकदा उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

77
काय काळजी घ्याल?
Image Credit : social Media

काय काळजी घ्याल?

वादळी वाऱ्यावेळी झाडांखाली किंवा कच्च्या बांधकामांजवळ उभे राहू नका. विजांचा कडकडाट होत असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
भारताचे बातम्या
महाराष्ट्र बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Now Playing
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे सांगितले संजय राऊत आणि बाळासाहेबांचे किस्से Sanjay Raut
Recommended image2
PM Modi: बॅलेट पेपरवरही काँग्रेसचा भोपळाच! पंतप्रधान मोदींचा टोला
Recommended image3
Mohun Bagan vs Punjab FC: मोहन बागानचा पंजाब एफसीवर २-१ ने दणदणीत विजय
Recommended image4
Valarmathi Protest: वलरमती पुन्हा आंदोलनस्थळी, लढा सुरूच ठेवण्याची घोषणा
Recommended image5
New Zealand Vs India: रविवारी पाचवा टी-२० सामना, मालिका ४-१ ने जिंकण्यावर भारताची नजर
Related Stories
Recommended image1
Lipulekh Pass: भारत-चीन सीमा व्यापार ६ वर्षांनी पुन्हा सुरू, व्यापाऱ्यांत उत्साह
Recommended image2
वाढदिवसाच्या रात्रीच काळाचा घाला! आर.जी. कर रुग्णालयात लिफ्टच्या दरवाजात अडकून तरुणाचा अंगावर काटा आणणारा अंत
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved