MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • पुणेकरांचा प्रवास आता सुसाट! स्वारगेट-कात्रज मेट्रो थेट खेड-शिवापूरपर्यंत; 'रिंग रोड'ला जोडणारा मेगा प्लॅन मंजूर

पुणेकरांचा प्रवास आता सुसाट! स्वारगेट-कात्रज मेट्रो थेट खेड-शिवापूरपर्यंत; 'रिंग रोड'ला जोडणारा मेगा प्लॅन मंजूर

Pune Metro extension to Khed-Shivapur: पुणे शहर सुधारणा समितीने स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाला खेड-शिवापूर टोलनाक्याजवळील प्रस्तावित रिंग रोडपर्यंत विस्तारण्यास मंजुरी दिली आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 21 2026, 04:50 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
पुणेकरांचा प्रवास आता सुसाट! स्वारगेट कात्रज मेट्रो थेट खेड शिवापूरपर्यंत
Image Credit : Asianet News

पुणेकरांचा प्रवास आता सुसाट! स्वारगेट-कात्रज मेट्रो थेट खेड-शिवापूरपर्यंत

पुणे: पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या स्वप्नांना आता नवे पंख मिळाले आहेत! स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचा विस्तार आता थेट खेड-शिवापूर टोलनाक्याजवळील प्रस्तावित 'रिंग रोड'पर्यंत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. शहर सुधारणा समितीने शुक्रवारी (दि. २० मार्च) या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली असून, यामुळे दक्षिण पुण्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. 

24
का घेतला हा मोठा निर्णय?
Image Credit : Google

का घेतला हा मोठा निर्णय?

पुणे शहराचा विस्तार वेगाने दक्षिण दिशेला, म्हणजेच कात्रज, आंबेगाव आणि खेड-शिवापूरच्या दिशेने होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती वाढल्या असून, दररोज हजारो नागरिक स्वारगेट किंवा शहराच्या मध्यवर्ती भागात कामासाठी येतात. सध्या या प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडी आणि महामार्गावरील धोकादायक प्रवासाचा सामना करावा लागतो. हाच ताण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार करण्याचा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे.

Related Articles

Related image1
Rupali Chakankar Resignation : अशोक खरात प्रकरणावर रुपाली चाकणकर यांची पत्रकार परिषद; आपली बाजू मांडत निष्पक्ष तपासाची मागणी
Related image2
Wather Update: सावधान! पुढील ४ दिवस धोक्याचे; महाराष्ट्रासह देशातील 'या' राज्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, गारपिटीचाही इशारा
34
काय होणार फायदा?
Image Credit : Asianet News

काय होणार फायदा?

शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विस्तारामुळे अनेक सकारात्मक बदल घडतील.

कोंडीतून कायमची सुटका: कात्रज घाट आणि हायवेवरील ट्रॅफिक जॅममध्ये अडकण्याऐवजी नागरिक सुरक्षितपणे मेट्रोने प्रवास करू शकतील.

रिंग रोडशी जोडणी: मेट्रोचा मार्ग प्रस्तावित रिंग रोडला जोडला गेल्यामुळे शहराबाहेरून येणारी वाहतूक विभागली जाईल आणि शहरांतर्गत रस्त्यांवरील ताण कमी होईल.

पर्यावरणपूरक प्रवास: खासगी गाड्यांचा वापर कमी होऊन प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल.

44
पुढील पाऊल काय?
Image Credit : X

पुढील पाऊल काय?

या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) लवकरच तयार केला जाणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती दिली जाईल. स्वारगेटहून थेट मेट्रोने खेड-शिवापूर गाठण्याचे पुणेकरांचे स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Pune : पुण्यात पवार कुटुंबाची तातडीची बैठक; बारामतीतील ‘पवार विरुद्ध पवार’ चर्चांना उधाण
Recommended image2
रिक्षा-टॅक्सी मराठी सक्तीत मोठा बदल? सरकारचा नवा निर्णय घ्या जाणून
Recommended image3
MHADA Pune Lottery 2026 : पुणेकरांसाठी मोठी संधी! म्हाडाच्या ७९२ घरांची सोडत जाहीर; जाणून घ्या संपू्र्ण अर्जप्रक्रिया
Recommended image4
मराठी सक्तीवरून तणाव शिगेला; रिक्षा-टॅक्सी संघटनांसोबत सरकारची निर्णायक बैठक उद्या
Recommended image5
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसीची अंतिम तारीख 30 एप्रिल; 26 लाख महिलांचा लाभ बंद होणार?
Related Stories
Recommended image1
Rupali Chakankar Resignation : अशोक खरात प्रकरणावर रुपाली चाकणकर यांची पत्रकार परिषद; आपली बाजू मांडत निष्पक्ष तपासाची मागणी
Recommended image2
Wather Update: सावधान! पुढील ४ दिवस धोक्याचे; महाराष्ट्रासह देशातील 'या' राज्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, गारपिटीचाही इशारा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved