काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, नांदेड लोकसभेची आणली होती जिंकून

| Published : Aug 26 2024, 09:38 AM IST / Updated: Aug 26 2024, 09:40 AM IST

vasant chavan
काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, नांदेड लोकसभेची आणली होती जिंकून
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे हैदराबादमध्ये निधन झाले आहे. लोकसभा २०२४ मध्ये त्यांनी नांदेडमधून विजय मिळवला होता.

जेष्ठ काँग्रेस नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर हैदरावबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत होते. उपचारादरम्यान वसंत चव्हाण यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांच्यावर हैदराबाद येथून नांदेडला एअर ऍम्ब्युलन्समधून आणण्यात आले आहे. 

नांदेडमधील जिंकली होती लढाई - 
 लोकसभा २०२४  ची निवडणूक यावेळी अटीतटीची लढाई झाली आहे. येथे खासदार अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे. येथे काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांना तिकीट देण्यात आलं होत. त्यामुळे येथे भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये चांगली लढाई झाली आहे. त्यांनी भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला हा विजय महत्वाचा मानला जात आहे. 

वसंत चव्हाण यांचे पार्थिव हैदराबाद येथून नांदेडला आणण्यात आले आहे. त्यांच्या तब्येत अचानक बिघडल्यामुळे अखेरचा श्वास त्यांनी हॉस्पिटलमध्ये घेतला आहे. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 
आणखी वाचा  - 
Janmashtami 2024 निमित्त खास संदेश पाठवून साजरा करा कृष्ण जन्मोत्सव