सार

राम मंदिराच्या उद्घाटनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंदिरांची स्वच्छता करण्यासाठी विशेष अभियान सुरू करण्याचे आवाहन केले होते. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना मंदिरांच्या स्वच्छतेचे निर्देश दिले आहेत. 

Temples Clean Drive In Maharashtra : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरांची स्वच्छता आणि सजावट करण्याचे निर्देश राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. येत्या 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. यामुळे रामललांच्या प्राणप्रतिष्ठेआधी राज्यातील मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवावे असेही एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी एक बैठक बोलावली होती. यादरम्यान, पंतप्रधानांनी मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहान केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. यामुळे महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मंदिरांच्या स्वच्छतेची मोहिम राबवावी. याशिवाय मंदिरांना रोषणाईही करावी हे देखील मुख्यमंत्र्यांनी बैठकीवेळी म्हटले.

“महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि विकास परिषदेला एखाद्या विशिष्ट कालावधीनंतर मंदिर आणि आसपासच्या परिसराच्या स्वच्छतेसाठी काही निधी वाटप केला पाहिजे. मंदिरांच्या स्वच्छतेसाठी एक विशेष योजना तयार करून जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेकडून यासाठी निधी ठरवला जाऊ शकतो” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकी वेळी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महसूल विभागाला या कामावर लक्ष ठेवण्यासाठी एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासही सांगितले आहे.

पंतप्रधानांकडून मंदिरांची स्वच्छता करण्याचे अपील

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधी देशातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता त्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात पूजा केली. याशिवाय नरेंद्र मोदींनी स्वच्छतेचे महत्त्व सांगत मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमही चालवली होती.

आणखी वाचा : 

Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'लेक लाडकी योजने'चा शुभारंभ, Schemeचा असा घेता येईल लाभ

Atal Setu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार अटल सेतूचे उद्घाटन, जाणून घ्या खासियत

Swachh Survekshan : देशातील सुरत आणि इंदूर सर्वाधिक स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या ठिकाणांचाही समावेश