लोकनेते अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. ते एक संघर्षशील आणि जनसामान्यांमध्ये आस्था असलेले नेते होते, ज्यांच्या जाण्याने राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. शासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे

संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. अजित पवार हे महाराष्ट्रातले लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेले, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असणारे नेते होते. जनसामान्यामध्ये त्यांच्याप्रति आस्था होती. अजित पवार हे संघर्षशील असे नेतृत्वात होते, कठिण परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होते.महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा अतिशय कठीण आहे. अशा प्रकारचे नेतृत्वात तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. महाराष्ट्राच्या विकासात अतिशय महत्वपूर्ण योगदान देत होते, असा वेळी जाणे अविश्वसनीय धक्का आहे. माझ्यासाठी तर एक दमदार आणि दिलदार असा मित्र सोडून गेला आहे. त्यांच्या कुटुंबावर प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथ शिंदे बारामतीत निघणार आहोत. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सकाळपासून संपर्कात

पुढच्या सगळ्या गोष्टी परिवाराशी चर्चा करून ठरविल्या जातील सुप्रिया सुळे आणि पार्थ यांच्याशी चर्चा झाली. आज शासकीय सु्ट्टी घोषित केली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. कधीही भरून न निघणारे असे नुकसान आहे. महाराष्ट्रात लोकनेते गेल्यावर पोकळी भरून काढले कठिण आहे. इतक्या सोबत जवळून सममगतर्षाच्या काळात काम केले, अशा गोष्टीवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही.