Sambhajinagar Paithan Road Traffic Diversion : संभाजीनगर-पैठण मुख्य मार्गावर रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर–पैठण मुख्य मार्गावर बिडकीन पोलिस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीमुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. चित्तेगाव आणि बिडकीन परिसरात सुरू असलेल्या या कामामुळे दररोज दोन–तीन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार 26 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान सर्व अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

अवजड वाहनांसाठी नवे पर्यायी मार्ग

संभाजीनगर - पैठण मार्ग

संभाजीनगर, वाळूज, इमामपूरवाडी, रांजणगाव शेकटा, बिडकीन, पैठण

पैठण - संभाजीनगर मार्ग

पैठण, बिडकीन, शेकटा, रांजणगाव, इमामपूरवाडी, वाळूज, संभाजीनगर

कचनेर – बिडकीन – पोरगाव मार्गासाठी बदल

जाण्यासाठी

कचनेर कमान, राष्ट्रीय महामार्ग 42, चौफुली निलजगाव, पैठण/पोरगाव

येताना

पैठण, बिडकीन, निलजगाव, पोरगाव चौफुली, कचनेर कमान, राष्ट्रीय महामार्ग 72, संभाजीनगर

गिरनेरा – गेवराई तांडा मार्गातील बदल

जाण्यासाठी

संभाजीनगर, गेवराई तांडा, गिरनेरा, पैठण

येताना

पैठण, बिडकीन, निलजगाव, बोकूड जळगाव, गिरनेरा तांडा, गेवराई तांडा, संभाजीनगर

पोलिसांचे आवाहन

वाहतूक विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की, रस्त्याचे काम सुरळीत आणि सुरक्षितरीत्या पार पाडण्यासाठी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. यामुळे अपघातांचा धोका कमी राहील आणि वाहतुकीची गती सुरळीत राखली जाईल.