Mumbai : मुंबईतील एक प्रसिद्ध स्टॉक ब्रोकर या डिजीटल अरेस् स्कॅममुळे 58 दिवसांत ₹58 कोटींच्या हानीने दणका बसला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी खोटे CBI/ED आदेश दाखवून पुलिस अटकची भीती दाखवली पोलिसांनी अनेक आरोपी अटक केली असून, तपास  सुरु आहे.

Mumbai : मुंबईतील एक प्रसिद्ध स्टॉक ब्रोकर या डिजीटल अरेस् स्कॅममुळे 58 दिवसांत ₹58 कोटींच्या हानीने दणका बसला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी खोटे CBI/ED आदेश दाखवून पुलिस अटकची भीती दाखवली पोलिसांनी अनेक आरोपी अटक केली असून, तपास अजून सुरु आहे.

मुंबईमध्ये सायबर जगताला हादरवणारी घोटाळ्याची घटना समोर आली आहे, जिथे एका नामांकित स्टॉक ब्रोकरवर डिजीटल अरेस्ट स्कॅम चा मोठा हल्ला करण्यात आला. या कारवाईदरम्यान ₹58 कोटी इतकी फसवणूक 58 दिवसांच्या कालावधीत करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना मनी हाइस्टस्कॅमसारखी असल्याचं माध्यमांनी म्हटलं आहे.

या फसवणुकीत तक्रारदार आणि त्याची पत्नी यांना व्हिडीओ कॉलद्वारे धक्कादायक धमक्या दिल्या होत्या. गुन्हेगारांनी स्वतःला CBI आणि ED अधिकारी म्हणून सादर करून, ब्रोकरला डिजीटल अरेस्ट केल्याची भीती दाखवली आणि संपत्ती व पैशांची ताबा घेण्याचा दबाव टाकला. पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. या अफरातफरीत 18 बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. काही खात्यांमध्ये प्रत्येकाला सुमारे ₹25 लाखांची हस्तांतरित रक्कम आढळली आहे. या प्रकारच्या डिजीटल अरेस्ट स्कॅमची व्याप्ती फार मोठी असल्याचं पोलिस अनुमान करत आहेत. घोटाळाकरणाऱ्यांचा जाळं भारतात आणि परदेशात पसरलेलं असावं, असा संशय आहे. सध्या सायबर सेल तपास करत असून, पैशांची मागावी व रिकवरीसाठी प्रयत्न सुरू आहेत.