राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे म्हटले असले तरी, छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ यांच्या मते, दोन्ही पक्षांचे प्रमुख नेतेच याबाबत योग्य वेळी निर्णय घेतील.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसा प्रस्ताव काँग्रेसने दिल्याचं सांगितलं आहे. मात्र तसा कोणताही प्रस्ताव नाही, ही चर्चा कुठून आणि कशी सुरू झाली? याची कल्पना नाही, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांनी केलं विधान
यावर आता छगन भुजबळ यांनी विधान केलं आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या विलानीकरणाची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे. काही निर्णय घ्यायचा असल्यास दोन्ही पक्षांचे प्रमुख घेतील. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
विलनीकरणाची चर्चा सोशल मीडियात
विलनीकरणाची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे. जर काही असं होणार असेल तर आमच्या पक्षाच्या प्रमुख आणि त्यांचे पक्षाचे प्रमुख हे वेळ येईल तेव्हा त्याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. शरद पवार हे देशातील जुने नेते असून मोदी साहेब त्यांना येऊन भेटतात. इतर लोक देखील त्यांचा मान सन्मान राखतात. ते आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असून भुजबळ यांनी म्हटलं आहे.
अजित पवार असताना होणार होत विलीनीकरण
अजित पवार यांच्या अपघाताबाबत यावेळी छगन भुजबळ यांनी विधान केलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांच्या निधनापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विलीनीकरणावर चर्चा सुरु होती. मात्र अजून तरी हि केवळ चर्चाच सुरु असल्याचं दिसून आलं आहे.


