पुण्यातील खराडी परिसरातील एका फ्लॅटवर पोलिसांनी धाड टाकून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. यावेळी २ महिलांसह ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी माहिती समोर आली आहे. पुण्यातील खराडी परिसरातील लॉजवरच्या फ्लॅटवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी २ महिलांसह ५ पुरुषांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एका राजकीय पक्षातील महिला नेत्याच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

कोठे झाली रेव्ह पार्टी? 

पुण्यातील खराडी येथील फ्लॅटवर रेव्ह पार्टी ठेवण्यात आली होती. यामध्ये अंमली पदार्थ, दारू आणि हुक्का मोठ्या प्रमाणावर सापडला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी येथे छापा टाकला. या छाप्यामध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याचं सांगितलं होत.

रेव्ह पार्टीला पदार्थ कोणी पुरवले? 

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. यापूर्वी शहरात अवैध दारू अड्यांवर छापे टाकण्यात आले. रेव्ह पार्टीच्या वेळी उपस्थित असणाऱ्या पाच जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रेव्ह पार्टीचे आयोजन कोणी केले, अमली पदार्थ कुणी पुरवले याचा तपास केला जात आहे.