अकोल्यात डेटिंग अँपवरून एका समलैंगिक व्यक्तीसोबत अत्याचार आणि फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेतील अधिकाऱ्याला फसवून त्याच्याकडून ८० हजार रुपये उकळण्यात आले.

डेटिंग अँपचा वापर आताच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यावरून फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. अकोल्यात समलैंगिक व्यक्तीसोबत अत्याचार करून फसवणूक केल्याचं धक्कादायक रूप समोर आलं आहे. बँकेतील एका अधिकाऱ्याला डेटिंग अँपवरून फसवून त्याच्याकडून पैसे उकलण्यात आले. थोडेथोडके नव्हे तर तब्बल ८० हजार रुपये लुटण्यात आले.

दोघांमध्ये समलैंगिक संबंध झाले होते 

तयार अकोल्यातील बँकेतील एका अधिकाऱ्याची समलैंगिक डेटिंग अँपवर एका व्यक्तीशी ओळख झाली आणि नंतर त्यांची चांगली मैत्री तयार झाली. त्यानंतर १४ जून रोजी अधिकारी आरोपी असणाऱ्या व्यक्तीला भेटायला गेला आणि दोघांमध्ये समलैंगिक संबंध तयार झाले. यावेळी दोघांनी कारमध्ये बसून प्रवास केला होता. त्यानंतर अचानक चुकीचं वळण लागलं.

चौघांनी केला शारीरिक अत्याचार 

त्यावेळी आरोपी मनीषने त्याच्या मित्रांना याठिकाणी बोलावून घेतलं. या चौघांनी मिळून बँकेतील अधिकाऱ्यावर अत्याचार केले. त्याच चित्रीकरण त्यांनी मोबाइलमध्ये केलं होत. हा व्हिडीओ दाखवून अधिकाऱ्याला वेळोवेळी ब्लॅकमेल करण्यात आले. सुरुवातीला ३० हजार आणि टप्याटप्याने त्याच्याकडून ८० हजार रुपये उकळण्यात आले. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. अशा घटना इतर समलैंगिक लोकांसोबत घडल्या असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल करावी असं पोलिसांच्यावतीने आवाहन करण्यात आलं आहे.