सार
पालघर जिल्ह्यातील एका रुग्णालयात प्रसूतीदरम्यान एका ३१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. प्रसूतीदरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.
पालघर: आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील एका रुग्णालयात प्रसूतीदरम्यान एका ३१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.
विक्रमगड तालुक्यातील गालतारे गावची रहिवासी कुंता वैभव पडवळे(३१) यांना मंगळवारी रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला सरकारी पतंगशाह कुटीर रुग्णालय, जव्हार येथे रेफर करण्यात आले. मात्र, प्रसूतीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
बाळाचाही मृत्यू
जव्हार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक भरत महाले यांनी सांगितले की, आदिवासी महिला ठीक होती, पण प्रसूतीदरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही, असे त्यांनी सांगितले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरपंच हत्या : ३ फरार आरोपींना पकडण्यासाठी बीड पोलिसांचं पत्रक; बक्षिसाची घोषणा
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण