- Home
- Maharashtra
- ३१ डिसेंबरला रात्री किती वाजेपर्यंत पार्टी चालणार? बार, हॉटेल आणि वाईन शॉपसाठी राज्य सरकारचे नवीन 'डेडलाईन' नियम जाहीर!
३१ डिसेंबरला रात्री किती वाजेपर्यंत पार्टी चालणार? बार, हॉटेल आणि वाईन शॉपसाठी राज्य सरकारचे नवीन 'डेडलाईन' नियम जाहीर!
31 December Bar Wine Shop Timing : महाराष्ट्र सरकारने नाताळ, नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा दिला. २४, २५, ३१ डिसेंबर या ३ दिवसांसाठी राज्यातील बार, वाईन शॉप्स, परमिट रूम पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली.

३१ डिसेंबरसाठी राज्य सरकारची विशेष सवलत
मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देत २०२६ चं जल्लोषात स्वागत करता यावं, यासाठी महाराष्ट्र सरकारने नागरिकांना आणि हॉटेल व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २४, २५ आणि ३१ डिसेंबर या तीन दिवसांसाठी मद्यविक्रीच्या वेळेत मोठी शिथिलता जाहीर केली आहे.
गृह विभागाच्या विशेष आदेशानुसार, या दिवशी राज्यातील बार, वाईन शॉप्स, परमिट रूम, बीअर बार आणि मद्यालये निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टचा उत्साह रात्री उशिरापर्यंत टिकून राहणार आहे.
सेलिब्रेशनला अडथळा नको, म्हणून निर्णय
२०२५ या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला चालना मिळावी, तसेच नागरिकांच्या सेलिब्रेशनमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने सरकारने मद्यविक्रीच्या वेळेत सवलत दिली आहे.
मात्र, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. एखाद्या जिल्ह्यात परिस्थिती संवेदनशील असल्यास, संबंधित जिल्हाधिकारी या सवलतीच्या वेळेत कपात करू शकतात, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणाला किती वेळेपर्यंत परवानगी?
वाईन शॉप्स आणि रिटेल मद्यविक्री
साधी विदेशी मद्य विक्री दुकाने (FL-2):
रात्री १०:३० ऐवजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत
Premium FL-2 दुकाने:
रात्री ११:३० ऐवजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत
वाईन आणि बिअर रिटेल शॉप्स:
मध्यरात्री १ वाजेपर्यंत विक्रीस परवानगी
परमिट रूम आणि क्लब (FL-3 / FL-4)
मुंबई, पुणे, ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्र:
रात्री १:३० ऐवजी थेट पहाटे ५ वाजेपर्यंत
इतर भाग:
रात्री ११:३० नंतर सवलत देत पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा
बीअर बार (Form E / E-2)
मध्यरात्रीनंतरही व्यवसाय सुरू ठेवता येणार
ग्राहकांना पहाटे ५ वाजेपर्यंत सेवा देण्यास परवानगी
देशी दारू दुकाने (CL-3)
महानगरपालिका तसेच ‘अ’ व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्र:
रात्री ११ ऐवजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत
ग्रामीण भाग:
रात्री १० ऐवजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहणार
जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार
राज्य सरकारने ही सवलत दिली असली, तरी स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शांतता भंग होण्याची शक्यता असल्यास, सवलतीच्या वेळेत बदल किंवा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

