सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावात लखपती दीदींना शुभेच्छा दिल्या आणि पोलंड दौऱ्याचा किस्सा सांगितला. त्यांनी ११३ व्या 'मन की बात' मध्ये चांद्रयान ३ आणि अंतराळ मोहिमेवर भाष्य केले.

१. जळगावात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी कार्यक्रमात बोलताना आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. आणि लखपती दीदींना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पोलंडमधील किस्साही सांगितला.

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी आपले मनोगत सांगितले. हा त्यांचा ११३ वा 'मन की बात' कार्यक्रम होता. यामध्ये त्यांनी चांद्रयान 3 आणि अंतराळ मोहिमेसोबतच युवा पिढीसाठी अंतराळ क्षेत्रातील सुधारणांबाबत देशवासीयांशी संवाद साधला.

३. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, शेतकरी केवळ अन्न उत्पादक न राहता इंधन उत्पादकही बनू शकतात. बायोफ्यूल उत्पादनातून शेतकरी श्रीमंत होऊ शकतात, असा विश्वास नितीन गडकरी यांनी नागपुरात व्यक्त केला.

४. पोलंड आणि युक्रेनचा यशस्वी दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. भारताकडून युक्रेनला वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. 

५. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमता निर्माण, संशोधन, नवोन्मेषाला चालना देण्यासाठी विज्ञान धारा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे.