सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 24 ऑगस्टच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा दुर्दैवाने कोसळला आहे. यामागचे कारण अजून कळू शकलेले नाही. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडले होते.

२. भिडे गुरुजींची लायकी, श्रेष्ठता ही महान आहे, भिडे गुरुजी यांची उंची हिमालयासारखी तर शरद पवार म्हणजे फर्ग्युसनची टेकडी आहे, असे हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे म्हणालेत. पुण्यातील भोरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चात ते बोलत होते.

३. भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरममधील रामा हॉटेलबाहेर राडा झाला आहे. यावेळी जोरदार आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

४ . रविवारी पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला झाल्यामुळे याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून पुण्यात आंदोलन केले आहे.

५. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे. 

६. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण यांचे हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले आहे. 

७. १४ सप्टेंबरपर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार नाही. 

८. पुणे येथील खडकवासला धरणातून २६ हजार ३४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.