एशियानेट न्यूज पोर्टलवर 23 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
१. शिवसेनेकडून ४५ उमेदवारांची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

२. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत.
३. महाविकास आघाडी आज सकाळी जागावाटप करणार आहे.
४. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अमित ठाकरे हे निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत, त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून सदा सरवणकर हे उभे राहणार आहेत.
५. निलेश राणे हे आज शिवसेना पक्षात प्रवेश करणार असून त्यांचा सामना वैभव नाईक यांच्याशी होणार आहे.
