सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 15 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. महायुतीच्या नेत्यांची आज महत्वाची पत्रकार परिषद असून विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. 

२. काल रात्री उदय सामंत आणि मनोज जरांगे यांची भेट झाली असून दोघांमध्ये २ तास चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 

३. उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी झाली असून आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. 

४. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत भाजपकडून विक्रांत पाटील आणि चित्रा वाघ यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

५. भाजपच्या १०० उमेदवारांची नावे ठरल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली आहे.