सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 14 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. संजीवराजे निंबाळकर आज तुतारी हातात घेणार असून अनेक जणांचे आज शरद पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. 

२. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशिष जैस्वाल यांची विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

३. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक असून ९ वाजता सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

४. दिल्लीत आज काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांच्या महाराष्ट्रातील जागावाटपावरून बैठक होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

५. निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.