Maharashtra Board 12th Result 2024 : 12 वीचा निकाल झाला जाहीर, काही विषयांमध्ये मिळाले चक्क पैकीच्या पैकी मार्क्स

| Published : May 21 2024, 01:54 PM IST

CBSE Board 12th Results 2024

सार

12 वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. सर्व विभागांमधल्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवेळीप्रमाणे यावेळीही कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागला आहे. या विभागाचा 97.51 टक्के लागला असून मुंबईचा निकाल सर्वात कमी 91.95 टक्के इतका लागला.या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला आहे. एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.

12 वीच्या निकालात मुलींनीच मारली बाजी - 
दरवेळीप्रमाणे यावेळीही 12 वीमध्ये मुलींचा निकाल चांगला आहे. मुलींचा निकाल 95.44 टक्के आहे तर मुलांचा निकाल 91.60 इतका लागला. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा चांगली आहे. विशेश बाब म्हणजे 12 वीच्या परीक्षेतील 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल हा चक्क 100 % इतका लागला आहे. 12 वीच्या परीक्षेनंतर नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परत परीक्षा घेतली जाणार आहे. 

 • विभागनिहाय निकाल
  कोकण : 97.51 टक्के
 • पुणे : 94.44 टक्के
 • कोल्हापूर : 94.24 टक्के
 • अमरावती : 93 टक्के
 • छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
 • नाशिक : 94.71 टक्के
 • लातूर : 92.36 टक्के
 • नागपूर : 93.12 टक्के
 • मुंबई : 91.95 टक्के

कुठे पाहता येणार निकाल?

 • mahresult.nic.in
 • http://hscresult.mkcl.org
 • www.mahahsscboard.in
 • https://results.digilocker.gov.in
 • http://results.targetpublications.org

आणखी वाचा - 
बारावीचा निकाल 93.37 टक्के, यंदाही मुलींची बाजी तर कोकण विभाग सर्वात अव्वल!
हा अपघात नसून हत्या आहे, पुणे हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या तरुण तरुणीच्या नातेवाईकांची संतप्त भावना