हेल्दी आरोग्य आणि बाळासाठी प्रेग्नेंसीमध्ये करता येतील ही 5 सोपी योगासने
Yoga During Pregnancy : योगाभ्यास केल्याने शरिर लवकीच होते असे असे म्हटले जाते. याशिवाय योगासनांचा शरिरातील प्रत्येक अवयवाला फायदा होत मजबूत होतात. अशातच प्रेग्नेंसीमध्ये हेल्दी आरोग्य आणि बाळासाठी पुढील काही सोपी योगासने पाहणार आहोत.
| Published : Jun 19 2024, 10:10 AM IST / Updated: Jun 19 2024, 10:12 AM IST
- FB
- TW
- Linkdin
जागतिक योग दिवस 2024
प्रत्येक वर्षी 21 जूनला जागतिक योग दिवस साजरा केला जातो. या निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासह योगा करण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जाते. योगा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करु शकतात. पण गर्भवती महिलांना प्रेग्नेंसीदरम्यान नक्की कोणती योगासने करावीत याबद्दल कळत नाही. जाणून घेऊया गर्भवती महिलांसाठी कोणती 5 सोपी योगासने आहेत याबद्दल अधिक...
बद्धकोणासन
प्रेग्नेंसीदरम्यान बद्धकोणासन करणे अतिशय फायदेशीर ठरू शकते. यामुळे पेल्विक अवयवच्या स्नायूंना आराम मिळण्यासह शरिरातील रक्त पुरवठ्याची प्रक्रिया सुरळीत सुरु राहण्यास मदत होते. याशिवाय नॉर्मल डिलिव्हरसाठी देखील बद्धकोणासन फायदेशीर ठरू शकते.
वज्रासन
गर्भवती महिला वज्रासनही करु शकतात. यामुळे प्रेग्नेंसीदरम्यान महिलांना उद्भवणाऱ्या पचनासंबंधित समस्यांपासून दूर राहता येते. याशिवाय पेल्विक, पाठीचे स्नायू मजबूत होण्यासह बाळालाही याचा फायदा होतो.
ताडासन
प्रेग्नेंसीमध्ये ताडासन करणेही फायदेशीर मानले जाते. यामुळे शरिरात रक्त पुरवठा होण्याची प्रक्रिया सुरुळीत सुरु राहते. एवढेच नव्हे प्रेग्नेंसीदरम्यान कंबर आणि पाठ दुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.
सुखासन
प्रेग्नेंसीवेळी महिलांमध्ये मूड स्विंग्स होणे, चिडचिड होणे अशा समस्या निर्माण होतात. अशातच महिला सुखान हे सोपे आसन करु शकता. यामुळे तणाव, थकवा आणि एंग्जायटीपासून देखील दूर राहता येईल.
वीरभद्रासन
गर्भवती महिला वीरभद्रासनही करु शकतात. यामुळे स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळणे, गॅस्ट्रिक समस्यांपासून देखील दूर राहता येते.
या गोष्टींची घ्या काळजी
प्रेग्नेंसीदरम्यान प्रत्येक गोष्टीबाबत सावधगिरी बाळगावी. यामुळे योगासने करताना शरिरावर अत्याधिक जोर देण्याचा प्रयत्न करु नये. याशिवाय सुरुवातीला तज्ज्ञांच्या मदतीने योगासन करावे अथवा एखाद्याला सोबत घेऊन करावे.
आणखी वाचा :